एक भारत श्रेष्ठ भारत
शूरविर ते सीमेवर लढती
गीत भारत मातेचे स्फुरती
हिमालयाच्या कडेकपारि
जलदा वाहती सांज सकाळी
उत्तरेला नंदनवन फुलले
दक्षिण महासागराने भरले
उंच डोंगर पर्वत रांगा
किलबिलत्या पाखरांनो सांगा
भिन्न भाषा, भिन्न वेश
का प्रिय असा हा हिंद देश?
'एक भारत श्रेष्ठ भारत' असा
गुंफली 'समतेची माळ जसा
लेकी सावित्रीच्या इथे जन्मल्या
पदी सर्व त्या आरुढ जाहल्या
इतिहास घडला देशभक्तांनी
डौलाने तिरंगा फडके गगनी
शिवबा, ज्ञानबा, कुंभार गोरा
लक्ष्मी, अहिल्या, जिजा, इंदिरा
थोर महात्मे इथे निपजले
देशासाठी कायम लढले
चला आपणही निर्धार करु
एकात्मतेला हाती धरु
कवयित्री
सौं. वनिता महादेव लिचडे
पद. शिक्षिका
जि. प. व. प्रा. शाळा. ढोलसर
तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा
ConversionConversion EmoticonEmoticon