दैनिक परिपाठ
25 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
🔺️ दिनविशेष
१९८३: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.
१९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
२०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.
२०१५: ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : डाव येणे-अर्थ : खेळात राज्य येणे.
▪️वाक्य : लपाछपी खेळताना चंदूवर पहिल्यांदा डाव आला.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : वासरात लंगडी गाय शहाणी.
▪️अर्थ : मूर्ख माणसांमध्ये थोडे ज्ञान असणारा श्रेष्ठ असतो.
🔺️ कोडे
▪️ सर्वात वजनदार काय आहे ?
▪️उत्तर - पाप
🔺️सामान्यज्ञान
१) सानेगुरुजींचे पूर्ण नाव काय ?
उत्तर - पांडुरंग सदाशिव साने
२) कोणत्या प्राण्याचे रक्त निळ्या रंगाचे असते?
उत्तर - ऑक्टोपस
३) कोणता प्राणी उभा राहून झोपू शकतो?
उत्तर - घोडा
४) कोणत्या देशात मुंगी आढळत नाही?
उत्तर - ग्रीनलँड
५) जगातील सर्वात स्वस्त सोने कोठे मिळते?
उत्तर - हॉंगकॉंग
🔺️ बोधकथा
चांगले आचरण
दोन तरुण साधू उंच डोंगरावर असणार्या आपल्या मठाकडे निघाले होते.रस्त्यामध्ये एक ओढा होता. त्या ओढयाच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून गावात जायचे होते. पण ओढ्याला असणार्या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. दोन साधूंपैकी एका साधूने हे पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही.
त्या साधूने दुसर्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला, मित्रा! बराच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे. तेव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग. तो दुसरा साधू म्हणाला, हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्रीस्पर्श सुद्धा वज्र्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला, मित्रा, ती स्त्री जेव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो.
तात्पर्य - माणसाच्या मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनत नाही.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon