सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 23 April

 

दैनिक परिपाठ

23 एप्रिल 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
आवडतं तेच करू नका ; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

🔺️ दिनविशेष 
१८१८: इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले.

१९९०: नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९९५: जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

२००५: मी अॅट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :  ठाण मांडणे - अर्थ : एका जागेवर बसून राहणे.  

▪️वाक्य : कंपनीच्या दरवाजावर संपकऱ्यांनी ठाण मांडले.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : लाज नाही मला कोणी काही म्हणा

▪️अर्थ  : निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही.

🔺️ कोडे 
▪️ सर्वश्रेष्ठ दूध कोणते ? 

▪️उत्तर - मातेचे 

🔺️ सामान्यज्ञान 
१) जगातील सर्वात लहान देश कोणता
आहे ?
उत्तर -  व्हॅटिकन सिटी
२) कोणता प्राणी सगळ्यात मोठा आहे?
उत्तर - हत्ती
३) कोणता प्राणी सगळ्यात उंच आहे?
उत्तर - जिराफ
४) कोणता प्राणी सगळ्यात चपळ आहे?
उत्तर - हरीण
५) कोणता प्राणी सगळ्यात वेगवान आहे?
उत्तर - चित्ता
🔺️ बोधकथा
        बहिरी ससाणा आणि कोंबडा
एक शेतकऱ्याचा एक कोंबडा होता, त्यास एके दिवशी असे समजले की, ‘आज आपला धनी आपणास मारून खाणार.’ मग तो आपण शेतकर्‍याच्या हाती न सापडावे म्हणून इकडेतिकडे लपून बसू लागला.

आपल्या बरोबरीच्या कोंबडयांच्या माना कापताना आपल्या धन्यास त्याने पुष्कळ वेळा पाहिले होते व तेव्हापासून त्याला मोठी दहशत बसली होती. त्याला जवळ बोलावून त्याची मान कापावी, या हेतूने त्या शेतकऱ्याने पुष्कळ गोड शब्द बोलून व धान्य दाखवून त्याला जवळ आणण्याचा प्रयत्न केला. परंतु कोंबदा पूर्वीच सगळे जाणून असल्यामुळे, त्याच्या गोड बोलण्यास भुलून फसला नाही.

जवळच एका पिंजर्‍यात त्या शेतकर्‍याचा बहिरी ससाणा होता, त्याने जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा तो कोंबडयास म्हणतो, ‘अरे, तू किती मूर्ख आणि कृतघ्न आहेस ! आपल्या धन्याने मारलेली हाक ऐकल्याबरोबर त्याच्याजवळ जाऊन तो काय म्हणतो ते ऐकून घेणे हे तुझे कर्तव्य नाही काय ? या बाबतीत माझे वर्तन कसे आहे, हे लक्षात घे. मला दुसरी हाक मारण्याचा प्रसंग आपल्या धन्यास मी कधीही येऊ देत नाही, हे तू पाहिलेच आहेस.’

कोंबडा उत्तर करतो, ‘खरेच ! पण मजप्रमाणे तुझी मान सुरीने कापून, तुझ्या मांसाचे तुकडे तव्यावर भाजून खावे, या उद्देशाने जर धन्याने तुला जवळ बोलाविले, तर तू मजप्रमाणेच लपून बसशील, याबद्दल मला बिलकुल संशय वाटत नाही. ’

तात्पर्य : परिस्थितीप्रमाणे मनुष्याच्या वर्तनात बदल व्हावा हे साहजिकच आहे.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »