दैनिक परिपाठ
20 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं.
🔺️ दिनविशेष
१९३९: अॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.
१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.
१९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
२००८: डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ - झुंज देणे-अर्थ : लढा देणे, संघर्ष करणे.
▪️वाक्य : भारतीय सेनेने शत्रूच्या सैन्याशी कडवी झुंज दिली.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का?
▪️अर्थ : प्रत्येक गोष्टीला ठराविक मर्यादा असते.
🔺️ कोडे
▪️ सर्वश्रेष्ठ फूल कोणते आहे ?
▪️उत्तर - कापसाचे फूल
🔺️ सामान्यज्ञान
१) FSSAI चे ‘Eat Right Station’ प्रमाणपत्र मिळविणारे पहिले रेल्वे स्थानक कोणते?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई
२)भारताचे स्वित्झर्लंड कोणाला म्हणतात ?
उत्तर - काश्मीर
३) भारतात कोणत्या राज्याची राजभाषा
इंग्रजी आहे?
उत्तर - नागालँड
४) भारतातील पहिले ज्ञानपीठ विजेते कोण ?
उत्तर - जी. शंकर कश्यप
५) मॅगसेसे पुरस्कार विजेते पहिले भारतीय ?
उत्तर - विनोबा भावे
🔺️ बोधकथा
बहिरी ससाणा,कासव आणि सिंह
खूप वर्षापूर्वी, जंगलात एका झाडावर बहिरी ससाणा हा पक्षी आणि त्याचे कुटुंब राहत असते. त्यांची जंगलातल्या प्राण्यांशी विशेषत: कासव सिंह आणि पाणकावळा ह्या सर्वांशी त्याची छानच मैत्री होते.
एक दिवस एक शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी येतो. तो ससाण्याच्या पिल्लाला झाडावर पाहतो. ससाण्याचे मांस खाण्याची इच्छा शिकाऱ्याची होते . त्याची शिकार करण्याचे तो ठरवतो. त्यासाठी शिकारी आग पेटवितो. हे सगळे दृश्य त्या पिलाची आई पाहते असते. ती पतीला सांगते कि, 'आपल्या मित्रांना मदतीसाठी बोलवा नाही तर शिकारी आपल्या पिल्लाला खाऊन टाकेल.
ससाणा लगेचच मित्रांना बोलवायला जातो. त्याचे मित्र कासव, सिंह, पाणकावळा लगेचच त्याच्या मदतीसाठी निघतात. पाणकावळा शिकाऱ्याने केलेला जाळ पाहतो आणि त्याच्यावर चोचीने पाणी शिंपडतो. कासव त्यावर वाळू टाकून आग विझवतो. सिंह मोठ्याने गर्जना करतो.
सिंहाची गर्जना ऐकून शिकारी घाबरून पळून जातो. ससाणा त्याच्या मित्राने वेळेवर मदत केल्याने त्यांचे आभार मानतो. पुढे ते सगळे आनंदाने राहू लागतात.
तात्पर्य - संकट काळी जो मदत करेल तोच खरा मित्र.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon