दैनिक परिपाठ
18 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.
🔺️ दिनविशेष
१९३६: पेशव्यांची राजधानी असणार्या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.
१९५०: आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
१९५४: गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.
१९७१: एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान सम्राट अशोक हे सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.
२००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक GSLV- D1 वाहकाचे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : जागरूक राहणे-अर्थ : सतर्क राहणे, सावध राहणे.
▪️वाक्य : सीमेवर भारतीय सैन्य नेहमी जागरूक राहते.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : झाकली मूठ सव्वा लाखाची.
▪️अर्थ : व्यंग नेहमी झाकून ठेवावे.
🔺️ कोडे
▪️ ळा गौ मं ग री कोणता सण ?
▪️उत्तर - मंगळागौरी
🔺️ सामान्यज्ञान
१) वृक्ष प्रत्यारोपण धोरण जाहीर करणारे
पहिले राज्य कोणते?
उत्तर : दिल्ली
२) प्रत्येक घरापर्यंत पेयजल कनेक्शन
पुरवठा करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : गोवा
३) टी 20 मध्ये 10,000 धावा करणारा
आशियातील पहिला क्रिकेटपटू कोण होता?
उत्तर : शोएब मलिक
४) राज्यातील पहिले दिव्यांगांसाठीचे
न्यायालय कोठे आहे?
उत्तर : शिवाजीनगर, पुणे
५) डिसेबल एअरक्राफ्ट रिकव्हरी इक्विपमेंट (DARE) मिळवणारे पहिले भारतीय विमानतळ कोणते आहे?
उत्तर : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ,बेंगळुरू
🔺️ बोधकथा
सिंहाचा जावई
एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, "तुला हवं ते मागं."
मी तुझी इच्छा पूर्ण करीन.' सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, "महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?'
यावर सिंह म्हणाला, "अरे नाही रे, मी राजा आहे आणि राजा आपले वचन कधीच मोडत नाही. माग तुला काय हवे ते'. यावर उंदीर म्हणाला, "मला तुमचा जावई करून घ्या." सिंहाने ते मान्य केले.
त्याप्रमाणे सिंहाने आपल्या मुलीशी उंदराचे लग्न लावून दिले.सर्व विधी झाले. पण सप्तपदीच्या वेळी नवरीच्या पायाखाली नवरदेव सापडले व चिरडून ठार झाले.
तात्पर्य : आपल्या कुवतीबाहेरच्या एखाद्या गोष्टीची हाव धरली, तर स्वत:चाच नाश ओढवतो.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon