सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 15 April

    

दैनिक परिपाठ

15 एप्रिल 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही.

🔺️ दिनविशेष 
१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.

१९२३: मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.

१९४०: दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.

१९९७: मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :    जखडून ठेवणे-अर्थ : बांधून ठेवणे. 

▪️वाक्य : परीक्षा जवळ आल्यामुळे नीताने स्वत:ला पुस्तकांशी जखडून ठेवले.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : एका हाताने टाळी वाजत नाही.
▪️अर्थ  : प्रत्येक कार्यात दोनी बाजूचा सहभाग असावा.

🔺️ कोडे 
▪️ मी अ ष्ट कु ळ गो कोणता सण ? 

▪️उत्तर - गोकुळाष्टमी

🔺️ सामान्यज्ञान 
१) ड्रोनच्या साह्याने टोळघाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?
उत्तर : भारत
२) आदिवासी वसतिगृहांसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिसा
३) गुराख्याकडून गाईचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : छत्तीसगड (गोधन न्याय योजना)
४) भारतात सर्वांत पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
५) भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?
 उत्तर : भारतरत्न
🔺️ बोधकथा
      बासरीवाला मुलगा आणि गावकरी
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर.त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही.

ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या उंदराचा बंदोबस्त करतो. तुम्ही मला त्या बदल्यात शंभर सुवर्णमुद्रा द्या. गावकरी तयार होतात. मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो.

त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात. व त्याच्यामागे धावू लागतात. तो तसाच नदीत जातो. त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात.बासरीवाला गावकर्‍यांना आपली बिदागी मागतो. मात्र, गावकरी शंभर सुवर्णमुद्रा द्यायला नकार देतात. बासरीवाल्याला गावकर्‍यांची लबाडी कळून येते.तो म्हणतो ठिक आहे, आता मी तुम्हांला कशी अद्दल घडवतो ते पहा. तो पुन्हा बासरी वाजवत गावात फिरू लागतो. या वेळी त्याच्या बासरीचे सूर ऐकून लहान मुले त्याच्याकडे आकर्षली जातात. ती त्याच्या मागे धावू लागतात.गावकर्‍यांना भीती वाटते की उंदराप्रमाणे तो आपल्या मुलांनाही नदीत नेऊन बुडवेल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवून शंभर सुवर्णमुद्रा देतात.

तात्पर्य : उपकार करणार्‍याशी कृतघ्न वागू नये.         

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »