दैनिक परिपाठ
13 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
तुलना करावी पण अवहेलना करू नये.
🔺️ दिनविशेष
१८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.
१९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
१९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : छातीत धस्स होणे - अर्थ : अचानक खूप घाबरणे.
▪️वाक्य : जंगलातून प्रवास करताना समोर आलेला वाघ पाहून शंतनूच्या छातीत धस्स झाले.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : नावडतीचे मीठ अळणी
▪️अर्थ : न आवडणाऱ्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट न आवडणे.
🔺️ कोडे
▪️ का ळ ला गो पा कोणता सण ?
▪️उत्तर - गोपाळकाला
🔺️ सामान्यज्ञान
१) सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिशा
२) ‘गुगल क्लासरूम’ सुविधांची
अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
३) प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : हिमाचल प्रदेश
४) एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन
आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण
करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : तमिळनाडू
५) भारतात लसीकरणाची परवानगी
मागणारी पहिली कंपनी कोणती?
उत्तर : फायझर
🔺️ बोधकथा
शहाणा गं माझा राजा
मनू शाळेच्या पायऱ्या उतरत होता. अचानक त्याला मुसमुसून रडण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिलं तर पायरीच्या कडेला एक फुलपाखरु पडलं होतं.ते जखमी होते.
"काय रे, काय झालं तुला ?"मनुने विचारलं.
"तो गणू दुष्ट आहे .त्यांना मला पकडलं . माझे पंख फाटले."
"अरेरे"
"आता मी घरी कसा जाऊ? मला आई पाहिजे ना!"
"कुठे आहे तुझं घर?"
"त्या सूर्यफुलाच्या शेतात."
"चल मी नेतो तुला तुझ्या घरी."
"हळूच हा "
"मनुने फुलपाखराला हळूच ओंजळीत घेतलं आणि सूर्यफुलाच्या शेतात अलगद सोडलं ."
घरी गेल्यावर मनुने आईला ही हकीकत सांगितली. आईने मनुला जवळ घेतलं. त्याचा पापा घेतला आणि म्हणाली ," शहाणा गं माझा राजा तो"🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon