दैनिक परिपाठ
12 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
अपराध्याला पुन्हा पुन्हा क्षमा करणे हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.
🔺️ दिनविशेष
१९९७: भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
१९९७: पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.
१९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
२००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : चेहरा खुलणे - अर्थ : आनंद होणे.
▪️वाक्य : बाबांच्या हातातील खाऊ पाहताच लहानग्या अमिताचा चेहरा खुलला.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : तोंड दाबून बुक्क्यांचा मार
▪️अर्थ : कारण नसताना अन्याय सहन करणे.
🔺️ कोडे
▪️ ही ला का द कोणता सण ?
▪️उत्तर - दहीकाला
🔺️ सामान्यज्ञान
1) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?
उत्तर : अंतरा मेहता
2) पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?
उत्तर : निगार जोहर
3) पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?
उत्तर : राहुल देव
4) सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करार)
5) पहिले नंबरलेस कार्ड कोणते?
उत्तर : Fam Pay
🔺️ बोधकथा
चतुर कोकरू
एका कुरणात मेंढ्यांचा कळप चरत होता. कळपाची राखण करण्यासाठी काही कुत्रे होते. चरता चरता एक कोकरू कळपाच्या मागे राहिले.कळप पुढे निघून गेला. तिथे एक लांडगा कळपावर नजर ठेवून होता. एक कोकरू कळपाच्या मागे राहिल्याचे त्याने पहिले आणि तो त्या कोकराच्या मागे लागला.कोकरु धावू लागले. आपण आता लांडग्याच्या तावडीतून सुटत नाही हे त्याच्या लक्षात आले होते.मग ते धावण्याचे सोडून हसत लांडग्याला म्हणाले ,"लांडगे दादा,आनंदाने हसत हसत मरावे असे मला वाटते म्हणून तुम्ही थोडावेळ बासरी वाजवा म्हणजे मला खूप खूप आनंद होईल."
लांडग्याने कोकराचे ते म्हणणे मान्य केले .त्याने बासरी वाजवायला सुरुवात केली. बासरीचा आवाज कळपातील कुत्र्यांच्या कानी पडताच ते तेथे धावून आले. आलेले कुत्रे पाहताच लांडगा बासरी फेकून देऊन पळून गेला. अशा प्रकारे चतुर कोकराने मोठ्या चतुराईने आपले प्राण वाचवले. 🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon