दैनिक परिपाठ
09 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
🔺️ दिनविशेष
१९६७: बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.
१९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९५: लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : चक्कर मारणे-अर्थ : फेरफटका मारणे.
▪️वाक्य : नानाकाका दररोज सकाळी बागेमध्ये चक्कर मारतात.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : कुंपणानेच शेत खाणे
▪️अर्थ : सुरक्षा करणाऱ्यानेच घात करणे.
🔺️ कोडे
▪️ ध न बं क्षा र कोणता सण ?
▪️उत्तर - रक्षाबंधन
🔺️ सामान्यज्ञान
१) महात्मा गांधी यांना 'बापू' ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सरोजिनी नायडू
२) महात्मा गांधी यांना 'राष्ट्रपिता' ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सुभाषचंद्र बोस
३) महात्मा गांधी यांना 'मलंग बाबा' ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : खान अब्दुल गफार खान
४) महात्मा गांधी यांना 'महात्मा' ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी
५) मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : नागपूर
🔺️ बोधकथा
भविष्य
एका गावात एक ज्योतिषी राहत असे. हुशार पण गरीब होता. त्याचा ज्योतिषाचा अभ्यास इतका दांडगा होता कि त्याच्या गणिताप्रमाणेच जणू नियती घडवलेली असावी. पण नशिब कोणाला कुठे घेवून जाईल त्याचा नेम नाही. एके दिवशी त्याच्या बायकोबरोबर त्याचे जोरात भांडण झाले. बायकोने त्याला सांगितले कि आज तरी खायला घेवून या नाहीतर घरी येवू नका. हा बिचारा कोठे जावे कोणाला मागावे या विचारात होता. तितक्यात त्याला सुचले कि या देशा च्या राजाकडे जावे आणि त्याला भविष्य सांगावे तो खुश झाला तर आपले दिवस चांगले येतील. किमान काही दक्षिणा तरी पदरी पडेल. या आशेने तो दरबारात गेला. राजाने सगळी विचारपूस केली आणि त्याला भविष्य सांगायला सांगितले. ज्योतिषाने गणित मांडले आणि त्याचा चेहरा एकदम पडला. राजा अचंबित झाला आता हसतमुखाने भविष्याविषयी बोलणारा हा माणूस एकदम का उदास झाला. त्याने आदेश दिला कि जे आहे ते खरे सांग. त्याने सांगितले कि राजा येत्या काही दिवसात तू मरणार आहेस. हे ऐकून राजाची बोबडी वळली आणि त्याने त्या ज्योतिषाला अंधार कोठडीत टाकायला सांगितले. मदत राहिली बाजूला पण नशिबी अंधार कोठडी आली. याला काही दिवस उलटले आणि एका सरदाराला यात ज्योतिषाची काही चूक नाही हे जाणवले आणि तो त्याची मदत करायला गेला. सरदाराने सांगितले कि तू राजाला आता असे भविष्य सांग कि तो खुश होईल. ज्योतिषी राजाच्या परवानगीने पुन्हा दरबारात गेला आणि त्याने गणित मांडले. त्याने राजाला सांगितले कि राजा मला तुझा आणि तुझ्या राज्याचा उज्ज्वल भविष्य काळ दिसत आहे. येणारा नवीन राजा हा खूप दयाळू , पराक्रमी आणि प्रजेचे हित साधणारा आहे. आणि लवकरच तुझा मुलगा हा नवीन राजा होणार आहे. हे आपल्या मुलाचे कौतुक ऐकून राजा खुश झाला आणि त्याने त्या ज्योतिषाचा सन्मान करून त्याला भरपूर दक्षिणा दिली. पण प्रत्यक्षात आपला मृत्यू होणार हे त्याने लक्षात घेतले नाही.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon