सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 28 March

   

दैनिक परिपाठ

28 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फूल कशासाठी जगायचं हे शिकवते.

🔺️ दिनविशेष
१९४२: रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीग ची स्थापना केली.

१९७९: अमेरिकेतील थ्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.

१९९२: उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

१९९८: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-१०००० हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :    कोडकौतुक होणे-अर्थ : लाड होणे, शाबासकी मिळणे. 

▪️वाक्य : सौंदर्यस्पर्धेत प्रथम आलेल्या मधुराचे गावात कोडकौतुक झाले.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : जो गुळाने मरतो त्याला विष कशास!

▪️अर्थ  : जिथे गोड बोलून काम होते तिथे हिंसाचारची गरज नसते.

🔺️ कोडे 
▪️ उंचच उंच माझी मान.ओळखा पाहू मी कोण?

▪️उत्तर - जिराफ

🔺️ सामान्यज्ञान 
१) इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती?
उत्तर : भगतसिंग

२) जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता?
उत्तर : 13 एप्रिल 1919, अमृतसर
३)पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर : भुतान
४) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
उत्तर : जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड
५) जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?
उत्तर : हेली नॅशनल पार्क
🔺️ बोधकथा
          उपकाराची परतफेड
एका नदीच्या काठी झाडावर एक कबूतर बसले होते. अचानक त्याला पाण्यात एक मुंगी वाहून जाताना दिसली. कबूतराने दया येऊन झाडाचे एक पान तोडून पाण्यात टाकले. मुंगी त्या पानावर चढली आणि तिचा जीव वाचला.
काही दिवसांनंतर, तिथे एक पारधी आला. त्याने कबूतराकडे नेम धरला. हे त्या मुंगीने पाहिले. ती धावत गेली आणि तिने पारध्याच्या पायाचा जोरात चावा घेतला. पारध्याचा नेम चुकला आणि गोळीचा आवाज ऐकून कबूतर उडून गेले. अशा प्रकारे मुंगीने कबूतराचे प्राण वाचवले.
​बोध: आपण कोणावर उपकार केले, तर वेळ आल्यावर आपल्यालाही त्याची परतफेड मिळते. 'कर भला तो हो भला'.   

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »