ज्ञानकुंभ - 52
'कान' या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार पूर्ण करा.
🔶️ संकलित
❇️ शनिवार दिनांक 28/03/2026
उपक्रम : 'कान' या अवयवांशी संबंधित वाक्प्रचार पूर्ण करा.
🔺️ प्रश्नसूची
(१) कान -----------
-- न ऐकणे, बोलण्याकडे दुर्लक्ष करणे.
(२) कानात --------------
--- मुद्दाम न ऐकणे.
(३) कान-----------
---- दोष दाखवण्यासाठी समज देणे.
(४) कानी--------------
---- वारंवार बजावून सांगणे.
(५) कानी --------
---- एखादयाच्या गुप्तपणे चहाड्या करणे.
(६) कान -----------
---- दुसऱ्याची निंदानालस्ती करणे.
(७) कान ---------
---- एखादयाविषयी संशय किंवा गैरसमज निर्माण करणे.
(८) कर्णो--------------
---- सर्वांना समजणे.
(९) काना-------------
---- मारणे, कानशिलात भडकावणे.
(१०) कान ------------
---- समज देणे, अद्दल घडवणे.
(११) कान -------
---- शिक्षा करणे किंवा चूक कबूल करणे.
(१२) कान ----------
---- अजिबात ऐकू न येणे, बहिरे होणे.
(१३) कान ---------
---- एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकून कंटाळणे.
(१४) कान --------
---- लक्षपूर्वक ऐकणे.
(१५) कान----------------.
---- कर्कश आवाजामुळे ऐकू न येणे.
(१६) ----------- कानाचा ----------
---- खोटी गोष्ट लगेच खरी वाटणे.
(१७) कानात -------------
---- नको असलेली भयंकर गोष्ट न ऐकणे.
(१८) कान-----------
---- गुप्तपणे सल्ला देणे.
(१९) काना-----------
---- दुर्लक्ष करणे.
(२०) कानाला --------------
---- पुन्हा चूक होऊ नये म्हणून दक्ष राहणे.
(२१) काना----------------
---- माहीत नसल्याचे सांगणे.
(२२) कान----------------
---- स्पष्टपणे खरे बोलून दम देणे.
(२३) कान --------------
---- लक्षपूर्वक ऐकणे.
(२४) ------- कानाचे ------- कानाला ---------
---- गुपित राखणे.
🔺️ उत्तरसूची
(१) कान झाकून घेणे.
--- न ऐकणे, बोलण्याकडे दुर्लक्ष करणे.
(२) कानात बोळे घालणे.
---- मुद्दाम न ऐकणे.
(३) कानपिचक्या देणे.
---- दोष दाखवण्यासाठी समज देणे.ढ
(४) कानीकपाळी ओरडणे.
---- वारंवार बजावून सांगणे.
(५) कानी लागणे.
---- एखादयाच्या गुप्तपणे चहाड्या करणे.
(६) कान फुंकणे.
---- दुसऱ्याची निंदानालस्ती करणे.
(७) कान भरणे.
---- एखादयाविषयी संशय किंवा गैरसमज निर्माण करणे.
(८) कर्णोपकर्णी होणे.
---- सर्वांना समजणे.
(९) कानाखाली वाजवणे.
---- मारणे, कानशिलात भडकावणे.
(१०) कान उपटणे.
---- समज देणे, अद्दल घडवणे.
(११) कान धरणे.
---- शिक्षा करणे किंवा चूक कबूल करणे.
(१२) कान फुटणे.
---- अजिबात ऐकू न येणे, बहिरे होणे.
(१३) कान किटणे.
---- एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकून कंटाळणे.
(१४) कान देणे.
---- लक्षपूर्वक ऐकणे.
(१५) कानठळ्या बसणे.
---- कर्कश आवाजामुळे ऐकू न येणे.
(१६) हलक्या कानाचा असणे.
---- खोटी गोष्ट लगेच खरी वाटणे.
(१७) कानात बोटे घालणे.
---- नको असलेली भयंकर गोष्ट न ऐकणे.
(१८) कानमंत्र देणे.
---- गुप्तपणे सल्ला देणे.
(१९) कानामागे टाकणे.
---- दुर्लक्ष करणे.
(२०) कानाला खडा लावणे.
---- पुन्हा चूक होऊ नये म्हणून दक्ष राहणे.
(२१) कानावर हात ठेवणे.
---- माहीत नसल्याचे सांगणे.
(२२) कानउघडणी करणे.
---- स्पष्टपणे खरे बोलून दम देणे.
(२३) कान टवकारणे.
---- लक्षपूर्वक ऐकणे.
(२४) या कानाचे त्या कानाला कळू न देणे.
---- गुपित राखणे.

ConversionConversion EmoticonEmoticon