सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 16 March

 

दैनिक परिपाठ

16 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

🔺️ दिनविशेष 
१९६६: अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७६: इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.

२०००: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.

२००१: नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :  उंडारणे - अर्थ : बागडणे, हुंदडणे. 

▪️वाक्य : माळरानावरील हिरवे गवत पाहून वासरे उंडारली.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : विशी विद्या तिशी धन. 

▪️अर्थ  : योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तृत्वाचा अंदाज बांधता येतो.

🔺️ कोडे 
● पाणी आहे पण ओलं होत नाही, आरसा आहे पण फुटत नाही.
उत्तर - सावली

🔺️ सामान्यज्ञान 
१) भारतात सर्वप्रथम सागरी रुग्णवाहिका कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?
उत्तर -  केरळ
२)  भारताने अंतर्देशीय जलमार्ग कोणत्या देशात आणि केव्हा उघडले आहे?
उत्तर - 3 सप्टेंबर 2020 रोजी बांगलादेश
३) प्रधानमंत्री जन धन योजनेसाठी 2020 मध्ये किती वर्षे पूर्ण झाली?
उत्तर - 6 वर्षे
४) ध्यानचंद कोण होते?
उत्तर - दिग्गज हॉकी खेळाडू

५) द्रोणाचार्य पुरस्कार _________ च्या
सन्मानार्थ दिला जातो.
उत्तर - प्रशिक्षक

🔺️ बोधकथा
                चिलटांचा प्रताप
एका गावाजवळ एक मोठा तलाव होता. त्याच्या पलीकडे अरण्य होते. तलावात खूप पाणी होते. तलावात जास्त पाणी झालं तर ते गावात येवू नये म्हणून तलावाला एक बांध घातला होता. तलावाचा गावाला खूप फायदा होता. गावातले लोक अंघोळीला, धुण्याला, जनावरांसाठी हेच पाणी वापरत असत. तलावाच्या पलीकडच्या बाजूला काही झाडं होती. शेराची झाडं होती. त्या झाडाझुडपामध्ये बरेच कीटक होते. तसेच चिलटेहि होती. कधी कधी या चिलटांचा जथाच्या जथा तलावावर येत असे. तलावाच्या दुसऱ्या बाजूला एक साधू राहत असे. तो हि रोज तलावावर येत होता. तो रोजच आपल्या अंगावरील उपरणे काढून या चिलटाना हाकलून लावायचा. एक साधू पलीकडच्या काठावर उभारून चिलटे हाकलतो, हे काही तरुण मुले बघत होती आणि एकमेकात त्याची टिंगल करत होती. साधू मात्र रोज निष्ठेने हे काम करीत असे. एक दिवस साधू आजारी होता. त्याला तलावावर यायला जमले नाही. त्याच दिवशी नेमके जंगलातले दोन हत्ती पाणी पिण्यासाठी तलावापाशी आले. तलावावर भरपूर चिलटे घोंगावत होती. ती त्या दोन हत्तींच्या डोळयापाशी, कानापाशी, सोंडेत जावून घिरट्या घालू लागली. हत्ती यामुळे चिडले, त्यांना ती चिलटे मारता येईनात. हत्ती सैरावैरा पळू लागले. त्यात त्यांच्या पायांनी तलावाचा बांध फुटला. तलाव फुटला, गावात पाणी शिरले, घरं बुडाली, मानसं हवालदिल झाली. चिलटांच्या प्रतापामुळे सगळा गाव संकटात सापडला. तेंव्हा टिंगल करणाऱ्या मुलांना साधूच्या त्या चिलटे हाकलण्याच्या छोट्याशा कृतीचे अपरंपार महत्व समजले. 
तात्पर्य- छोट्याशा कृतीचेसुद्धा काही वेळेला खूप महत्व असते.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »