सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 15 March

दैनिक परिपाठ

15 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
झाडासारखे जगा,खूप उंच व्हा; पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

🔺️ दिनविशेष 
१९६१: ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.

१९८५: symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली.

१९९०: सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.

२००१: भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात २८१ धावा काढल्या.

२०११: सीरियन युद्ध सुरु झाले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :    उपोषण करणे-अर्थ : लंघन करणे, उपाशी राहणे. 

▪️वाक्य : आपल्या रास्त मागण्यांसाठी गिरणीतील कामगारांनी उपोषण केले.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : वळणाचे पाणी वळणावर जाणे.

▪️अर्थ  : ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार.

🔺️ कोडे 
▪️ माझ्याकडे एकच डोळा आहे, पण मी काहीही पाहू शकत नाही. सांगा पाहू मी कोण?
उत्तर : सुई

🔺️ सामान्यज्ञान 
 १) बटाट्याचा शोध कोणत्या देशात लावला गेला होता?
उत्तर: पेरू 
२) कोणत्या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे?
उत्तर: इंडोनेशिया

३) जगातील कोणता असा पर्वत आहे जो रोज आपला रंग बदलतो?
 उत्तर: एयर्स रॉक (Ayers Rock)/ उलरु (ऑस्ट्रेलिया)

४) एका माणसाच्या डोक्यावर अंदाजे किती केस असतात?
उत्तर: जवळजवळ १ ते १.५० लाख

 ५) नुआखाई सण हे कोणत्या राज्यात साजरा केले जातो?
उत्तर : ओडिशा आणि छत्तीसगड
🔺️ बोधकथा
                कौतुक आणि शिक्षा
एक नावाजलेली शाळा होती. सगळे शिक्षक कामसू आणि विद्यार्थीप्रिय होते. चित्रे गुरुजी हे चित्रकला शिक्षक होते. विद्यार्थ्यांना चित्रकला शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या वर्गात सगळे विद्यार्थी चांगले होते फक्त एक सोडून. तो विद्यार्थी जरा वेगळा होता. तो काम करणे यापेक्षा काम टाळणे, चुकारपणा करणे यासाठी प्रसिद्ध होता. एकदा असं झालं कि, चित्रे गुरुजींनी मुलांना धावत्या आगगाडीचं चित्र काढायला सांगितलं. सगळ्या मुलांनी भराभर कागद घेतले, पेन्सिली, खोडरबर, रंगीत खडू घेवून चित्र काढण्यास सुरुवात केली. चित्रे गुरुजींनी चित्र तासामध्ये पूर्ण करायला सांगितलं होतं. धावती आगगाडी काढायची म्हणजे रूळ, इंजिन, गाडीचा दाबा, पिस्टन, डब्यांच्यामधील जोडणी काढायला हवी होती मात्र आपले हे चुकार महाशय मात्र गप्पच बसले होते. गुरुजींनी विचारले, "कारे तुला चित्र काढायचं नाही का?" तो म्हणाला "हो! काढणार आहे. मी वेळेतच चित्र पूर्ण करणार आहे." तास संपायला दहा मिनिटे शिल्लक होती. त्याने भराभर चित्र काढले, तासाची घंटा वाजली, सर्व मुलांनी चित्र पूर्ण करून दिली, चुकार मुलानेही चित्र पूर्ण करून दिलं. त्यांना चित्र असं काढलं होतं, एक बोगदा काढला होता, या बाजूला रुळाची टोकं आणि गाडीच्या डब्याचा भाग. गुरुजींनी चित्र बघितलं आणि म्हणाले,"अरे मी तर धावत्या गाडीचं चित्र काढायला सांगितलं होतं, मग हे काय काढलस?" चुकार मुलगा म्हणाला,"गाडी धावतेच आहे, पण ती बोगद्यात आहे." गुरुजींनी सर्वाना गुण दिले पण याच्या चित्राला गुण दिले नाहीत, तो म्हणाला, "गुरुजी मला गुण केंव्हा देणार" गुरुजी म्हणाले,"तुझी गाडी बोगद्यातून बाहेर आल्यावर मी तुला गुण देईन" गुरुजींनी त्याच्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले पण कामचुकारपणाबद्दल शिक्षा केली. 

तात्पर्य - कोणतेही काम मन लावून करावे.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »