दैनिक परिपाठ
14 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
क्रांती हळूहळू घडते ; एका क्षणात नाही.
🔺️ दिनविशेष
२०००: कलकत्ता येथील टेक्निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
२००१: सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली.
२००१: व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
२०१०: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : उपरती होणे - अर्थ : पश्चात्ताप वाटणे.
▪️वाक्य : अभ्यास न करता दिवाळीची सुट्टी खेळण्यात फुकट घालवली याची मनोजला उपरती झाली.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : लग्नाला गेली आणि बारशाला आली.
▪️अर्थ : खूप उशिराने पोहोचणे.
🔺️ कोडे
▪️ अशी कोणती जागा आहे जिथे 100 लोक जातात आणि येताना 101 बाहेर येतात?
▪️उत्तर - वरात
🔺️ सामान्यज्ञान
1) परस्पर चॅट साठी भारतीय लष्कराने
स्वतःसाठी कुठल्या अँपची सुरुवात केली?
उत्तर : साई
2) आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका
दिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : ३० ऑक्टोबर
3) भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी
जहांगीर भाभा यांचा जन्मदिन केव्हा येतो?
उत्तर : ३० ऑक्टोबर
4) तुम्हांला माहिती आहे का एका मच्छरचे सरासरी आयुर्मान किती असते?
उत्तर : ५ - १० दिवस
5) जगात असा कोणता जीव आहे ज्याला मेंदू नसतो?
उत्तर: जेलीफिश
🔺️ बोधकथा
कर्तव्याचे पालन
एक तरुण आपल्या विधवा आईला सोडून पळून आला आणि एका मठात तंत्र मंत्र साधना करू लागला, अनेक वर्षे लोटली, एकेदिवशी त्याने आपले वस्त्र सुकविण्यासाठी टाकले आणि ध्यान करू लागला, डोळे उघडल्यावर पाहतो ते काय! एक कावळा त्याचे वस्त्र ओढत असल्याचे त्याला दिसले, हे पाहून तरुणाने त्या कावळ्याकडे क्रोधाने पाहिले.त्याक्षणी तो कावळा जळून खाक झाला. आपल्या सिद्धीचे यश बघून तो खुश झाला आणि अहंकाराने भिक्षा मागायला गेला. त्याने एका दारावर जावून आवाज दिला. पण कोणीच बाहेर आले नाही. त्याला फार राग आला. त्याने अनेक वेळेला आवाज दिला तेंव्हा एका स्त्रीने म्हटले," महाराज! थोडा वेळ थांबा! मी साधना समाप्त होताच आपल्याला भिक्षा वाढते." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा पारा चढला. त्याने म्हटले, "दुष्टे! तू आम्हाला ओळखत नाहीस. आमची परीक्षा बघतेस काय? याचे किती वाईट परिणाम होतील हे माहित आहे काय?" हे ऐकताच घरातील स्त्री म्हणाली," माहित आहे! तुम्ही शाप देताल. परंतु मी काही कावळा नाही जो आपल्या क्रोधाग्नीत भस्म होईल. मातेला एकटी सोडून मुक्ती मिळवू पाहणाऱ्या अहंकारी संन्याशा! तू माझे काही बिघडवू शकत नाही." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा सगळा गर्व चक्काचूर झाला. त्याने बाहेरूनच क्षमा मागितली तेंव्हा गृहस्वामिनी घराबाहेर आली तेंव्हा त्याने तिला तुम्ही कोणती साधना करता ? असा प्रश्न केला. तेव्हा ती म्हणाली,"आपली साधना तीच असते आपण जी कर्मे करतो ती कर्म सोडून मुक्तीच्या मागे धावलं तर मुक्ती मिळणे दुरापास्त होते व यातूनच अहंकार निर्माण होतो. मी गृहस्थ धर्माची उपासना करते आणि त्यात कसूर करत नाही." हे ऐकून त्याने अहंकाराचा त्याग करून व सन्यस्त जीवन सोडून मूळ कर्तव्याचे पालन करण्यासाठी आईकडे परतला.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon