दैनिक परिपाठ
13 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.
🔺️ दिनविशेष
१९९७: मदर तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली.
१९९९: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
२००३: मुंबई शहरातील लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले.
२००७: वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्घाटन झाले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : उदास होणे-अर्थ : खिन्न होणे.
▪️वाक्य : सहलीला जायला मिळाले नाही; म्हणून मिताली उदास झाली.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : राईचा पर्वत करणे
▪️अर्थ : मूळ गोष्ट लहान पण ती उगाचच मोठी करून सांगणे.
🔺️ कोडे
▪️ अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली, तरी दमत नाही?
▪️उत्तर - जीभ
🔺️ सामान्यज्ञान
1) जगातील सर्वात खोल महासागर कोणता?
उत्तर – पॅसिफिक महासागर
उत्तर – माऊंट एवरेस्ट (8852 मी.)
3) कोविड -१९ मध्ये कोणत्या राष्ट्रपतींचा
मृत्यू झाला?
उत्तर - प्रणव मुखर्जी
4) जगातील सर्वात उंच प्राणी कोणता?
उत्तर - जिराफ
5) एव्हरेस्टवर चढणारी सर्वात तरुण महिला कोण आहे?
उत्तर - डिकी डोल्मा
🔺️ बोधकथा
पाण्यात पाहणारे सांबर
एक सांबर एकदा पाणी पीत असताना त्याला आपले प्रतिबिंब दिसले. तो मनाशीच म्हणाला, 'माझी ही शिंगं किती सुंदर आहेत. तसंच माझं तोंड, डोळे फुलासारखं अंग सगळं कसं सुंदर आहे. पण माझे पायही असेच सुंदर असते तर काय मजा झाली असती! हे इतके बारीक पाय असण्यापेक्षा नसलेले बरे !' असे तो म्हणत आहे तेवढ्यात एक सिंह तेथे आला. त्याची चाहूल लागताच सांबर आपल्या बारीक पायांनी जोरजोरात पळू लागले. सिंहही त्याच्या मागे लागला. परंतु रस्त्यातच सांबराची शिंगे एका झाडात अडकली. त्यामुळे त्याला पळता येईना. सिंहाने त्याच्यावर झडप घातली. तेव्हा सांबर म्हणाले, 'अरेरे ! ज्या पायांना मी वाईट म्हणत होतो त्यांनी संकटातून माझी सुटका केली. पण ज्या शिंगांचा मला गर्व वाटत होता त्यांनी मात्र मला ऐनवेळी दगा दिला.'
तात्पर्य : आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपले प्राण वाचवू शकतात तर आवडणाऱ्या गोष्टी घातही करू शकतात.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon