सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 02 March

 

दैनिक परिपाठ

02 मार्च 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

🔺️ दिनविशेष 
१९६९: जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.

१९७०: ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्‍होडेशिया प्रजासत्ताक बनले.

१९७८: स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.

१९९२: आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :  आड येणे-अर्थ : अडथळा निर्माण करणे. 

▪️वाक्य : चांगल्या कार्याच्या जो आड येतो तो माणूस वाईट वृत्तीचा असतो

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : घोडामैदान जवळ असणे .

▪️अर्थ  : परीक्षा लवकरच होणे.

🔺️ कोडे
अशी कोणती गोष्ट आहे, जी बांधलेली असताना चालते आणि सोडली की थांबते?

उत्तर : घड्याळ (जुनी चावीची घड्याळे)

🔺️ सामान्यज्ञान 
1) महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत?
उत्तर - छत्तीस
2) आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर -  सिंधुदुर्ग
3) जगातील पिरॅमिड्स हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ?
उत्तर - इजिप्त
4) जन - गण - मन हे गीत कोणी लिहिले?
उत्तर - रवींद्रनाथ टागोर
5) 'मज्जाव' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द कोणता?
उत्तर -  बंदी


🔺️ बोधकथा
                 
             कर्म आणि धर्म 

भगवान गौतम बुद्ध यांना एका गावी प्रवचनासाठी निमंत्रण दिले होते. ज्या शेतकऱ्याने निमंत्रण दिले होते तो अत्यंत भाविक होता. आपणाबरोबर आपल्या गावातील लोकांना याचा लाभ व्हावा हि त्याची इच्छा होती. गावाबाहेरच्या एका विस्तीर्ण अशा मोकळ्या पटांगणात एक वृक्ष होता. त्याला पार होता. तेथे प्रवचन घेण्याचे ठरले. ज्या दिवशी प्रवचन सुरु होणार त्यादिवशीच त्या शेतकऱ्याला चिंतेने ग्रासले, त्याचा सर्वात लाडका बैल हरवला. शेतात बांधून ठेवला असता दावं तोडून बैल निघून गेला. शेतकरी बैलाला शोधायला बाहेर पडला. कोस-दोन कोस चालला. गावापलीकडच्या डोंगराशी कुरण होते. तिथे त्याने बैलाला शोधलं मात्र डोक्यात विचार प्रवचनाचे चालू होते. खूप वेळ निघून गेला होता. शेतकऱ्याला प्रवचनाला जाता आले नाही. तोपर्यंत प्रवचन संपले होते. गावकरी घरी निघून गेले होते. बैल मिळाल्याचा आनंद आणि प्रवचन हुकल्याच दुख असे दोन्ही भाव त्याच्या मनात होते.

         दुसऱ्या दिवशी मात्र शेतकरी वेळेत प्रवचनाला हजर राहिला. प्रवचन संपल्यावर विनम्रपणे गौतम बुद्धांच्या पाया पडून तो म्हणाला," महाराज, मी काल प्रवचनाला येवू शकलो नाही. क्षमा करा. माझा बैल हरवला होता. पण बैलाला शोधतानासुद्धा माझे प्रवचन हुकले व चांगले विचार ऐकण्यापासून वंचित राहिलो याचे दुख मनाला डाचत होते." यावर बुद्ध मंदस्मित करीत म्हणाले," चांगल्या गोष्टी ऐकण्यापासून वंचित राहिल्याचे दु:ख तुला झाले यातच तुझे भले आहे. आणि बैलाला शोधणे हे तुझे कर्तव्य आहे. तू बैलाला शोधत असताना सुद्धा प्रवचनाचा विचार करत होता म्हणजेच तू कर्म करत असताना धर्माचा विचार करत होता, कर्म करणे हेच धर्माचे मुख्य सार आहे."

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »