सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 28 February

दैनिक परिपाठ

28 फेब्रुवारी  

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
श्रद्धा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच परमेश्वराची कृपा होते.
🔺️ दिनविशेष 
१९२२: इजिप्तला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

१९३५: वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.

१९४०: बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :  अवाक् होणे - अर्थ : आश्चर्यचकित होणे. 

▪️वाक्य : अचानक उमटलेले इंद्रधनुष्य पाहून सर्व अवाक् झाले.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : उंटावरचा शहाणा 

▪️अर्थ  : मूर्ख सल्ला देणारा.

🔺️ कोडे 
▪️अशी कोणती बॅग आहे,जी भिजवल्यावर तिचे काम करते ? 
▪️उत्तर : – टी बॅग

🔺️ सामान्यज्ञान 
१) महाराष्ट्रात जलविद्युत केंद्र कोठे आहे ?
उत्तर -  भिवपुरी
२) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर - तिसरा

३) भारतातील सर्वात मोठा पर्वत कोणता ?
उत्तर - कांचनगंगा
४) या भारतात बंधुभाव.......... हे गाणे कोणी
लिहिले ?
उत्तर -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
५) 26 जानेवारीला आपण कोणता राष्ट्रीय
सण साजरा करतो ?
उत्तर - प्रजासत्ताक दिन


🔺️ बोधकथा
                 पैसा कसा वाचवाल?
ही गोष्ट आहे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांची. राजेंद्रबाबूंची राहणी खूपच साधी होती. एकदा चालताना राष्ट्रपती राजेन्द्रबाबुंना त्रास होऊ लागला. लक्षात असं आलं की त्यांच्या चपला झिजल्या आहेत आणि त्याला मारलेला खिळा त्यांच्या पायाला टोचू लागला आहे. मग राष्ट्रपतींनी आपल्या स्वीय सहाय्यकाला नवीन चप्पल आणण्यास सांगितले. त्याने सेवकासोबत जावून नवीन चपलांचा जोड आणला. 

राष्ट्रपतींनी विचारले, "या चपलेची किंमत किती?" "सोळा रुपये" सहाय्यकाने सांगितले. "सोळा रुपये? गतवर्षी मी माझ्या चपला बारा रुपयांना घेतल्या होत्या.तुम्ही खात्री करा."राष्ट्रपती म्हणाले. यावर स्वीय सहाय्यक म्हणाले "साहेब त्या दुकानात बारा रुपयांच्या पण चपला आहेत.पण त्यापेक्षा या चपला मऊ आणि चांगल्या आहेत आणि मुख्य म्हणजे मऊ असल्याने टोचणार नाहीत. म्हणून सोळा रुपये देवून मीच आणल्या. आपल्या सेवकाचेही या चपलाबाबत मत चांगले वाटले."

राष्ट्रपती म्हणाले, "अहो,मऊ चपला आहेत आणि चांगल्या दिसतील म्हणून तुम्ही चार रुपये जास्त मोजले. त्यापेक्षा असे करा की या चपला दुकानात परत करा आणि मला बारा रुपयांच्याच चपला आणून द्या आणि महत्वाचे म्हणजे त्यासाठी वेगळा असा हेलपाटा घालू नका. त्या बाजूला येणाऱ्या जाणाऱ्या कोणाकडून तरी हे काम करून घ्या. अन्यथा असे व्हायचे की चपलेत चार रुपये वाचविण्यासाठी तुम्ही पाच रुपयांचे पेट्रोल खर्च करून गाडीने जाल" 

स्वीय सहाय्यक हे सर्व ऐकतच राहिले. देशाच्या सर्वोच्च पदी बसणाऱ्या व्यक्तीबद्दल त्यांचा आदर आणखी वाढला. 

तात्पर्य - पैशांची अकारण उधळपट्टी करू नये. 

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »