ज्ञानकुंभ - 33
🔶️सौजन्य शिष्यवृत्ती मार्गदर्शिका
❇️ शनिवार दिनांक 28/02/2026
🔰 उपक्रम : समूहदर्शक शब्द
🔺️ प्रश्नसूची
1) काजूची,माशांची –
2) किल्ल्यांचा –
3) केसांचा –
4) केसांची –
5) केळ्यांचा –
6) खेळाडूंचा –
7) गवताचा –
8) आंब्यांच्या झाडांची –
9) उतारुंची –
10) उपकरणांचा –
11) उंटांचा,लमाणांचा –
12) करवंदाची –
13) गवताची –
14) गाईगुरांचे –
15) गुरांचा –
16) चोरांची, दरोडेखोरांची –
17) जहाजांचा –
18) तारकांचा –
19) ताऱ्यांचा –
20) नारळांचा -
21) नोटांचे –
22) पक्ष्यांचा –
23) प्रवाशांची –
24) फुलझाडांचा –
25) फुलांचा –
26) बांबूंचे –
27) भाकऱ्यांची,रुपयांची –
28) मडक्यांची –
29) प्रश्नपत्रिकांचा –
30) पाठ्यपुस्तकांचा –
31) पालेभाजीची –
32) द्राक्षांचा –
33) दुर्वांची –
34) धान्यांची –
35) नाण्यांची –
36) पिकत घातलेल्या आंब्यांची –
37) पुस्तकांचा,वह्यांचा –
38) पोत्यांची,नोटांची –
39) फळांचा –
40) माणसांचा –
41) वाद्यांचा –
42) विटांचा, कालिंगडांचा –
43) विद्यार्थ्यांचा –
44) विमानांचा –
45) मुलांचा –
46) मुंग्यांची –
47) मेंढयांचा –
48) लाकडांची,उसांची –
49) वस्तूंचा -
50) वेलींचा –
51) साधूंचा –
52) वानरांची -
53) घरांची -
54) ढगांचा -
55) सैनिकांचे/सैनिकांची -
56) हत्तींचा –
57) हरिणांचा –
58) मातीचा,विटांचा -
59) वाळूचा -
🔺️उत्तरसूची
1) काजूची,माशांची – गाथण
2) किल्ल्यांचा – जुडगा
3) केसांचा – झुबका,पुंजका
4) केसांची – बट,जट
5) केळ्यांचा – लोंगर , घड
6) खेळाडूंचा – संघ
7) गवताचा – भारा
8) आंब्यांच्या झाडांची – राई
9) उतारुंची – झुंड,झुंबड
10) उपकरणांचा – संच
11) उंटांचा, लमाणांचा – तांडा
12) करवंदाची – जाळी
13) गवताची – गंजी , पेंढी
14) गाईगुरांचे – खिल्लार
15) गुरांचा – कळप
16) चोरांची, दरोडेखोरांची – टोळी
17) जहाजांचा – काफिला
18) तारकांचा – पुंज
19) ताऱ्यांचा – पुंजका
20) नारळांचा - ढीग
21) नोटांचे – पुडके
22) पक्ष्यांचा – थवा
23) प्रवाशांची – झुंबड
24) फुलझाडांचा – ताटवा
25) फुलांचा – गुच्छ
26) बांबूंचे – बेट
27) भाकऱ्यांची,रुपयांची – चवड
28) मडक्यांची – उतरंड
29) प्रश्नपत्रिकांचा – संच
30) पाठ्यपुस्तकांचा – संच
31) पालेभाजीची – गड्डी,जुडी
32) द्राक्षांचा – घड,घोस
33) दुर्वांची – जुडी
34) धान्यांची – रास
35) नाण्यांची – चळत
36) पिकत घातलेल्या आंब्यांची – अढी
37) पुस्तकांचा,वह्यांचा – गठ्ठा
38) पोत्यांची,नोटांची – थप्पी
39) फळांचा – घोस
40) माणसांचा – जमाव
41) वाद्यांचा – वृंद
42) विटांचा, कालिंगडांचा – ढीग
43) विद्यार्थ्यांचा – गट
44) विमानांचा – ताफा
45) मुलांचा – घोळका
46) मुंग्यांची – रांग
47) मेंढयांचा – कळप
48) लाकडांची,उसांची – मोळी
49) वस्तूंचा - संच
50) वेलींचा – कुंज
51) साधूंचा – जथा
52) वानरांची - टोळी
53) घरांची - चाळ
54) ढगांचा - घनमंडल
55) सैनिकांचे / सैनिकांची - तुकडी,पथक,फलटण
56) हत्तींचा – कळप
57) हरिणांचा – कळप
58) मातीचा,विटांचा - ढिगारा
59) वाळूचा - ढीग

ConversionConversion EmoticonEmoticon