सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 25 February

दैनिक परिपाठ

25 फेब्रुवारी  

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

🔺️ दिनविशेष 
१९४५: दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९६८: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९८६: जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.

१९९६: स्वर्गदारातील तार्‍याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ :  अभंग असणे - अर्थ : एकसंध, अखंड असणे. 

▪️वाक्य : कितीही संकटे आली, तरी भारतीयांची एकात्मता अभंग राहील.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : काकडीची चोरी फाशीची शिक्षा.

▪️अर्थ  : अपराध खूप लहान पण त्याची शिक्षा मात्र खूप मोठी.

🔺️ कोडे 
▪️कान असून बहिरा. 

▪️उत्तर - चहाचा कप

🔺️ सामान्यज्ञान 
१) मतदानाच्या अधिकारासाठी व्यक्तीचे
किती वय पूर्ण झालेले असावे?
उत्तर - अठरा वर्ष
२) संविधान सभेचे मध्ये एकूण किती
सभासद होते ?
उत्तर - 292
३) 'मेरा रंग दे बसंती चोला' हे गीत कोणत्या क्रांतिकारकांनी म्हटलं आहे ?
उत्तर - भगतसिंग
४) 15 ऑगस्ट 2019 रोजी भारताला
स्वातंत्र्य मिळून किती वर्ष पूर्ण झाली ?
उत्तर - 75 वर्ष
५) भारताचे पितामह कोण ?
 उत्तर - दादाभाई नवरोजी


🔺️ बोधकथा
                    भाऊबीज
एका गावात एक बहिण भाऊ राहत होते. बहिणीचे आणि भावाचे दोघांचीही लग्ने झाली होती. बहिण तिच्या घरी सुखाने नांदत होती. भावाच्या सुखातसुद्धा काही कमी नव्हती. भाऊबीजेचा सण होता. आज माझा भाऊ जेवायला येणार म्हणून बहिणीने सगळी तयारी केलेली होती. स्वंपाक आवरून दारात उभी राहून ती भावाची वाट पाहत होती. बराच वेळ झाला तरी भाऊ आला नाही, तेवढ्यात दारी दोन याचक भिक्षा मागण्यास आले. बहिणीने सणाच्या दिवशी याचक न जेवता जाणार म्हणून तिने त्या दोघांना जेवायला वाढले, दोघे याचक पोटभर जेवले. बहिणीला त्यांनी सांगितले,"ताई !आज सणाचा दिवस! तू आम्हांला जेवण दिले. आम्ही याचक नसून यमाचे दूत आहोत आणि यमआज्ञा अशी आहे कि आजपर्यंत ज्या पुरुषाला कुणी शिव्या दिल्या नाहीत, त्याला घेवून ये असे यमराज म्हणाले आहेत. तू आमचा आत्मा तृप्त केला म्हणून आम्ही तुला हे गुपित सांगत आहोत." एवढे बोलून ते निघून गेले. दुतांचे बोलणे ऐकताच बहिण मनातून खूपच घाबरली कारण ती व तिचा भाऊ हे गावात अजातशत्रू म्हणून ओळखले जात. त्यामुळे या दोघांना कुणी शिव्या देण्याचा प्रसंगच उद्भवला नाही. आपल्या भावावर आज मरणाची छाया दिसताच तिने घराबाहेर धाव घेतली व तिला जितक्या म्हणून शिव्या येत होत्या त्या भावाच्या नावाने देण्यास सुरुवात केली.गावातील लोक चकित झाले, ज्या बहिणी भावाच्या मायेची उदाहरणे साऱ्या पंचक्रोशीत दिली जात होती त्या भावाची बहिण आज त्याला रस्त्याने शिव्या देत सुटली होती. ही बातमी भावापर्यंत पोहोचली, भावाला ज्याने ही बातमी दिली त्याला भाऊ म्हणाला," मित्र ! माझी बहिण मला शिव्या देते आहे यातसुद्धा माझे काहीतरी हीत तिने पाहिले आहे." शिव्या देत देत बहिण भावाच्या दाराशी आली, तो यमाचे दूत भावाच्या दारात उभे होते. त्यांना पाहताच बहिणीने भावाच्या नावाने शिव्यांचा शिमगा केला. हे ऐकताच यमाचे दूत त्यांच्या नियमानुसार निघून गेले. बहिण भावाकडे गेली व भावाला शिव्या देण्याचे गुपित सांगितले. एका बहिणीने शिव्या देवून भावाचा अपमृत्यू टाळला होता.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »