ज्ञानकुंभ - 31
❇️ बुधवार दिनांक 25/02/2026
🔴 उपक्रम : वाक्यांवरून मराठी लेखक, लेखिका, कवी,कवयित्री ओळखणे.
🔺️ प्रश्नसूची
१) कुसुमचा ज्येष्ठ बंधू ज्याने मराठी दिवस दिला -
२) आधुनिक वाल्मिकी -
३) मराठी गझल आणि तरल शृंगारिक भावगीतांचा बादशाह -
४) मोठ्या, वाईट व्यसनाचे विदारक सत्य सांगणारे अजरामर नाटककार -
५) निख्खळ निर्भेळ, निरागस विनोदी लेखक आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व -
६) संपादक, उत्तम वक्ता, सिनेनिर्माता आणि भव्यदिव्य व्यक्तिमत्त्व असणारे हजरजबाबी विनोदी लेखक -
७) अतिशय प्रतिभाशाली, सारस्वताच्या सर्व प्रांतात विहार करणारी, गाढ अभ्यासक, तडफदार शलाका, जिच्या नावातच तिचे व्यक्तित्व आहे अशी -
८) छान छान कविता लिहिणारे त्याचे स्वतः वाचन करणारे आणि खास रशियन पद्धतीने दाढी राखलेले कवी -
९) गणपत वाणी आणि पिंपातील मेलेल्या उंदरांवर कविता करणारे
१०) ऐतिहासिक पात्रांना कादंबरीच्या रुपात अमर करणारे 'घुमा'पती -
११) ज्यांची प्रत्येक ओवी जीवनाचे सार सांगणारी, स्वानुभवाची, अशी सामान्य कास्तकरी कुटुंबातील महिला -
१२) दमलेल्या बाबाची कैफियत मांडणारा -
१३) आभाळाएवढे मनोहर व्यक्तिमत्व असलेला नवरा असला तरी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणारी, उत्तम काव्य अभिवाचिका -
१४) अत्यंत जहाल विचारांना लेखणीतून उतरविणारे, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्वनिष्ठ, सतीचे वाण घेणारा -
१५) गीतेला आई मानून अत्यंत सोप्या भाषेत ती लिहिणारा, चळवळ्या महर्षी -
१६) जनमानसावर भारुडाचे गारुड घालून समाज प्रबोधन करणारे संतकवी -
१७) देवा, नारायणा, ह्यांच्या गूढ आणि भयकथा वाचतांना जीवाला धाप लागते -
१८) गोड बोलून चिमटा काढत हास्याची कारंजी फुलवणाऱ्या -
१९) संवेदनशील लेखक, डॉक्टर, चित्रकार, ओरिग्यामी पारंगत, समाजभान असणारा लेखक,कवी -
🔺️उत्तरसूची
१) कुसुमचा ज्येष्ठ बंधू ज्याने मराठी दिवस दिला - कुसुमाग्रज
२) आधुनिक वाल्मिकी - ग. दि. माडगूळकर
३) मराठी गझल आणि तरल शृंगारिक भावगीतांचा बादशाह - सुरेश भट
४) मोठ्या, वाईट व्यसनाचे विदारक सत्य सांगणारे अजरामर नाटककार - राम गणेश गडकरी
५) निख्खळ निर्भेळ, निरागस विनोदी लेखक आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व - पु. ल. देशपांडे
६) संपादक, उत्तम वक्ता, सिनेनिर्माता आणि भव्यदिव्य व्यक्तिमत्त्व असणारे हजरजबाबी विनोदी लेखक - प्र. के. अत्रे
७) अतिशय प्रतिभाशाली, सारस्वताच्या सर्व प्रांतात विहार करणारी, गाढ अभ्यासक, तडफदार शलाका, जिच्या नावातच तिचे व्यक्तित्व आहे अशी - दुर्गा भागवत
८) छान छान कविता लिहिणारे त्याचे स्वतः वाचन करणारे आणि खास रशियन पद्धतीने दाढी राखलेले कवी - मंगेश पाडगावकर
९) गणपत वाणी आणि पिंपातील मेलेल्या उंदरांवर कविता करणारे - बा. सि. मर्ढेकर
१०) ऐतिहासिक पात्रांना कादंबरीच्या रुपात अमर करणारे 'घुमा'पती - रणजित देसाई
११) ज्यांची प्रत्येक ओवी जीवनाचे सार सांगणारी, स्वानुभवाची, अशी सामान्य कास्तकरी कुटुंबातील महिला - बहिणाबाई चौधरी
१२) दमलेल्या बाबाची कैफियत मांडणारा - संदीप खरे
१३) आभाळाएवढे मनोहर व्यक्तिमत्व असलेला नवरा असला तरी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणारी, उत्तम काव्य अभिवाचिका - मल्लिका अमर शेख
१४) अत्यंत जहाल विचारांना लेखणीतून उतरविणारे, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्वनिष्ठ, सतीचे वाण घेणारा - वि. दा. सावरकर
१५) गीतेला आई मानून अत्यंत सोप्या भाषेत ती लिहिणारा, चळवळ्या महर्षी - विनोबा भावे
१६) जनमानसावर भारुडाचे गारुड घालून समाज प्रबोधन करणारे संतकवी - संत एकनाथ
१७) देवा, नारायणा, ह्यांच्या गूढ आणि भयकथा वाचतांना जीवाला धाप लागते - नारायण धारप
१८) गोड बोलून चिमटा काढत हास्याची कारंजी फुलवणाऱ्या - मंगला गोडबोले
१९) संवेदनशील लेखक, डॉक्टर, चित्रकार, ओरिग्यामी पारंगत, समाजभान असणारा लेखक,कवी - अनिल अवचट

ConversionConversion EmoticonEmoticon