सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 24 February

दैनिक परिपाठ

24 फेब्रुवारी  

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.

🔺️ दिनविशेष 
१९६१: मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.

१९८७: इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात १९८७ – ए या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.

२००८: फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.

२०१०: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : अपूर्व योग येणे
अर्थ : दुर्मिळ योग येणे. 

▪️वाक्य : सूर्यग्रहण व चंद्रग्रहण एकाच दिवशी होण्याचा अपूर्व योग आला.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : तळे राखील तो पाणी चाखील 

▪️अर्थ  : सोपावलेले काम पूर्ण करून आपला फायदा करून घेणे.

🔺️ कोडे 
▪️सरसर गेला साप नव्हे, गडगड गेला गाडा नव्हे, गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे. 

▪️उत्तर - पाण्याचा रहाट

🔺️ सामान्यज्ञान 
१) ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला' हे कोणी म्हटलेलं आहे ?
उत्तर - स्वातंत्र्यवीर सावरकर
२) भारतावर सर्वांत जास्त वर्षे राज्य करणारे परकीय कोण ?
उत्तर - इंग्रज
३) रवींद्रनाथ टागोरांनी इंग्रजांना कोणती
पदवी परत दिली ?
उत्तर - सर
४) जगातील सर्वात मोठे लोकशाही राज्य
असणारा देश ?
उत्तर - भारत
५) तीन रस्ते एकत्र मिळतात त्या ठिकाणाला काय म्हणतात ?
उत्तर - तिठा


🔺️ बोधकथा

        बुद्धीचा योग्य वापर
एक राजा कुशल प्रशासक होता. प्रजेचे सुख- दु:ख जाणून घेण्यासाठी तो साधारण वेशभूषा करून फिरत होता. एक दिवस जेंव्हा तो नगरातून जात होता तेंव्हा त्याला काही घोडेस्वार आपल्याकडे येताना दिसले, ते चोर असून आपल्याला लुटण्यासाठी येत आहेत असे राजाने हेरले. धाडसी राजा आता घाबरून जाण्याऐवजी लढण्यासाठी तयार झाला. त्याचवेळी त्याच्या घोड्याचा पाय खड्डयात अडकला. घोडा थोडासाही इकडे तिकडे हळू शकत नव्हता आणि चोर तर जवळ आले होते. तेवढ्यात तेथे काही तरुण आले. परिस्थिती ओळखून त्यांनी चोरांवर प्रतिहल्ला केला व हाकलून लावले. राजा यामुळे खुश झाला. त्याने त्या तरुणांना आपली ओळख दिली व बक्षीस म्हणून काही ना काही मागण्यास सांगितले. 

एका तरुणाने धन मागितले, दुसऱ्याने घर, तिसऱ्याने शेती, चौथ्याने सरपंचपद, पाचव्याने गावापर्यंत रस्ता बनवून मागितला आणि सहाव्याने म्हंटले, "महाराज ! मला काही देण्यापेक्षा तुम्हीच माझ्या घराचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी माझ्या घरी वर्षातून दोन वेळा यावे." राजाने सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या व सहाव्या तरुणाला घरी येण्याचे वचन दिले. राजा त्याच्या घरी गेला तेव्हा त्याचे घर खूप जीर्ण झाले होते. राजाला ते पाहवले नाही ते त्याने बांधून देण्याची आज्ञा केली. तसेच येण्याजाण्यासाठी चांगला रस्ता करून दिला. राजा हा पाहुणा म्हणून येत असल्याने त्याचा गावातील गावातील सन्मान वाढला. प्रतिष्ठा वाढली, राजाच्या जवळचा असल्याने राजदरबारी त्याचे म्हणणे मांडता येवू लागले. राजाने प्रत्येक वेळी त्याला काही ना काही वस्तू भेट दिल्याने त्याची श्रीमंती वाढत गेली. त्याच्या अक्कल हुशारीने तो गावातील प्रतिष्ठित नागरिक बनला.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »