सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 30

 

ज्ञानकुंभ - 30  

शेवटच्या शब्दावरून म्हणी ओळखा.

बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलित

❇️ मंगळवार दिनांक 24/02/2026

उपक्रम : शेवटच्या शब्दावरून म्हणी ओळखा.

🔺️ प्रश्नसूची

उदाहरणार्थ :

जगन्नाथ = आपला हात जगन्नाथ

१. विघ्न =

२. अंधार = 

३. फार =

४. पाषाण =

५. येणार ? =

६. धोंडा = 

७. मार = 

८. आधार = 

९. साचे = 

१०. चुली =

११. दिवस = 

१२. पारधी =

१३. पाय = 

१४. चांदणे =

१५. लाखाची = 

१६. वासा = 

१७. शनिवार =

१८. शहाणा =

१९. परमेश्वर = 

२०. महिना =

२१. पिळी =

२२.रिकामा =

२३) भार =

२४) सुनेचे =

२५) चिंध्या =

🔺️उत्तरसूची

१. विघ्न = नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न

२. अंधार = दिव्याखाली अंधार

३. फार = उथळ पाण्याला खळखळाट फार, रात्र थोडी सोंगे  फार

४. पाषाण = लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण(स्वतः) कोरडे पाषाण

५. येणार ? =आढ्यात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ?

६. धोंडा = खायला कोंडा निजेला धोंडा

७. मार = शहाण्या ला शब्दांचा मार

८. आधार = बुडत्याला काडीचा आधार, उधार पाहात वाण्याचा आधार

९. साचे = थेंबे थेंबे तळे साचे

१०. चुली = घरोघरी मातीच्या चुली, ज्याच्या घरी मुली, त्याच्या घरी पेटतील चुली

११. दिवस = नव्याचे नऊ दिवस, तेरड्याचे रंग तीन दिवस

१२. पारधी = ज्याच्या हाती ससा तो पारधी

१३. पाय = गोगलगाय नि पोटात पाय

१४. चांदणे = चोराच्या मनात चांदणे

१५. लाखाची = झाकली मूठ सव्वा लाखाची

१६. वासा = बडा घर पोकळ वासा

१७. शनिवार = न कर्त्याचा वार शनिवार

१८. शहाणा = पुढच्यास ठेच मागचा शहाणा, पत्रावळी आधी द्रोणा तोच जावई शहाणा

१९. परमेश्वर = प्रयत्नांती परमेश्वर

२०. महिना = दुष्काळात तेरावा महिना

२१. पिळी = बळी तो कान पिळी

२२.रिकामा = अति शहाणा त्याचा बैल रिकामा

२३) भार = खायला काळ अन् भुईला भार

२४) सुनेचे = चार दिवस सासूचे,चार दिवस सुनेचे

२५) चिंध्या = एक ना धड भाराभर चिंध्या

Previous
Next Post »