दैनिक परिपाठ
18 फेब्रुवारी
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
'दैनिक परिपाठ' या सदरात काही सूचना,बदल,सुधारणा आवश्यक असतील तर कृपया comment करावी. आपल्या अमूल्य मताचा आदर केला जाईल.
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
- भाट्टे (रत्नागिरी)
०२) युरोपचे रणक्षेत्राचा देश कोणता ?
- बेल्जियम
०३) कलीदेवी हे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
- तामिळनाडू
०४) संविधान सभेने उद्देशपत्रिकेचा स्विकार केव्हा केला ?
- २२ जानेवारी १९४७
०५) मॉरिशिअस या देशाची राजधानी कोणती आहे ?
- पोर्ट लुईस
दुर्गम भागात फिरताना तीन साधूंना एक झोपडी दिसते, ते झोपडीचा दरवाजा वाजवतात. घरातील महिला त्यांच्याकडे विचारणा करते,"आपण कोण आहात? आणि आपल्याला काय हवे आहे?" ते म्हणतात,"आम्ही तिघे भुकेले आहोत, अन्नाची काही व्यवस्था करा." झोपडी बाहेरील झाडाखाली विश्रांती करण्याची विनंती करत महिला पुन्हा घरात गेली.
काही काळानंतर बाहेर येत ती तिन्ही साधूंना जेवणासाठी आमंत्रित करते. तेंव्हा साधू म्हणतात," आमच्यापैकी केवळ एकचजण फक्त तुझ्या घरात प्रवेश करू शकतो." महिला आश्चर्यचकित होते व विचारते," असे का? भूक तिघांनाही लागली आहे. पण येणार मात्र एकच जण?"
साधू म्हणतात," हा आमच्यातील करार आहे. आमच्यातील एक "वैभव" आहे. तर दुसरा "यश" आणि तिसरा "प्रेम". आता तू ठरव की आमच्यातील कोणाला आत बोलवायचे?" महिला गोंधळून जाते. ती पुन्हा घरात जाते, नवऱ्याशी चर्चा करते आणि बाहेर येते व "प्रेम" नावाच्या साधूला जेवणासाठी निमंत्रण देते. प्रेम घरात येताच त्याच्या पाठोपाठ ''वैभव'' आणि "यश" साधू पण जेवणासाठी घरात येतात. महिला पुन्हा गोंधळून जाते, तेव्हा साधू म्हणतात," मुली ! तू प्रेम मागितले, त्या पाठोपाठ यश आणि वैभव तुझ्या घरात प्रवेशकर्ते झाले, पण तू वैभव किंवा यश यांना जर पाचारण केले असते तर आमच्यातील दोघे उपाशी राहिले असते." महिलेने तिघांचे यथायोग्य स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले.
तात्पर्य - जगात प्रेमापाठोपाठ यश आणि वैभवही आयुष्यात,घरात येते.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon