ज्ञानकुंभ - 26
🔶️ संकलित
❇️ बुधवार दिनांक 18/02/2026
उपक्रम : दोन भिन्न अर्थाचे शब्द - उत्तर मात्र एकच!
● प्रश्नसूची
१ संताप, संगीत प्रकार -
२ पायताण, विद्युलता -
३ ज्येष्ठ बंधू, गावगुंड -
४ कागदाचा, कापडाचा शत्रू, कमतरता -
५ मांडी, गणित -
६ फसवणूक, मंतरलेला दाेरा -
७ पु.लं.देशपांडे यांचा हातखंडा, एक संख्या -
८ धान्याची असते , आद्याक्षरांवरून ठरवितात-
९ अनेक रहिवासी असलेली इमारत, पैंजण -
१० एक अवयव, प्रतिष्ठा -
११ चतकाेर, वड्याचा साथीदार -
१२ प्रकाश देणारी, मुलीच्या मुलीची मुलगी -
१३ जन्मदाते, एक पालेभाजी -
१४ पराजय, गळयातील माळ -
१५ बाेलता न येणारा, बाळाची पापी -
१६ वैद्याचा स्टेथाेस्काेप, सलवारीची साेबतीण -
१७ हात, मिळकतीवर भरावा लागतो -
● उत्तरसूची
१ संताप, संगीत प्रकार - राग
२ पायताण, विद्युलता - चपला
३ ज्येष्ठ बंधू, गावगुंड - दादा
४ कागदाचा, कापडाचा शत्रू, कमतरता - कसर
५ मांडी, गणित - अंक
६ फसवणूक, मंतरलेला दाेरा - गंडा
७ पु.लं.देशपांडे यांचा हातखंडा, एक संख्या - कोटी
८ धान्याची असते , आद्याक्षरांवरून ठरवितात- रास
९ अनेक रहिवासी असलेली इमारत, पैंजण - चाळ
१० एक अवयव, प्रतिष्ठा - मान
११ चतकाेर, वड्याचा साथीदार - पाव
१२ प्रकाश देणारी, मुलीच्या मुलीची मुलगी - पणती
१३ जन्मदाते, एक पालेभाजी - पालक
१४ पराजय, गळयातील माळ - हार
१५ बाेलता न येणारा, बाळाची पापी - मुका
१६ वैद्याचा स्टेथाेस्काेप, सलवारीची साेबतीण - नाडी
१७ हात, मिळकतीवर भरावा लागतो - कर

ConversionConversion EmoticonEmoticon