दैनिक परिपाठ
15 फेब्रुवारी
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
'दैनिक परिपाठ' या सदरात काही सूचना,बदल,सुधारणा आवश्यक असतील तर कृपया comment करावी. आपल्या अमूल्य मताचा आदर केला जाईल.
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️सुविचार
स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
🔺️ दिनविशेष
१८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.
१९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.
१९४२: दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
१९६५: कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : हंबरडा फोडणे - मोठ्याने रडणे.
▪️वाक्य : वडील अपघातात गेल्याचे समजताच ताईने हंबरडा फोडला.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : संग तसा रंग
▪️अर्थ : संगतीप्रमाणे वर्तन असणे.
🔺️ कोडे
▪️उंचावरून पडली एक घार,
तिला केले मारून ठार,
आतील मास खाऊ पटापट,
गोड रक्त पिऊ गटागट.
ओळखा पाहू मी कोण?
▪️उत्तर- नारळ
🔺️ सामान्यज्ञान
१) कोणता प्राणी उडी मारू शकत नाही ?
- हत्ती
२) भारतातील सर्वात प्रदुषित नदी कोणती?
- यमुना
३) छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय ?
- महाराणी सईबाई
४) सर्वात सुरक्षित राज्य कोणते ?
- आंध्र प्रदेश
५) क्रिकेट खेळात किती खेळाडू असतात?
- 11
🔺️ बोधकथा
गुरुनाथ आणि नवाब
एकदा गुरुनानक सुलतानपूरच्या नवाबाकडे घरी गेले. नवाबानी गुरुदेवांचे आत्मीयतेने स्वागत केले. त्यानंतर दोघांच्यामध्ये धर्मावर चर्चा सुरु झाली. नवाबानी म्हटले, आपण हिंदू-मुस्लीम यामध्ये काहीच अंतर करत नाही. त्यामुळे आज तुम्ही माझ्याबरोबर नमाज अदा करण्यासाठी चला. नानकदेव म्हणाले,देणारा एक आहे आणि घेणारा एक आहे तर मी कोण अंतर करणारा? चला मशिदीत चला. दोघेही मशिदीत गेले.
नवाबसाहेब नमाज अदा करू लागले, नानकही ध्यानमग्न होवून एका मुद्रेत उभे राहिले. नमाज होताच नवाब म्हणाले, आपण तर नमाज अदा केली नाही. नानक म्हणाले, "माफ करा! आपण जेव्हा नमाज अदा करत होता तेव्हा माझे मन माझ्या स्वामींकडे होते. त्या वेळी मला आपल्या स्वामींच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. मात्र आपले लक्ष नमाजाकडे कमी आणि माझ्याकडे जास्त होते काय?
आपण देवाचा धावा करतो तेव्हा आपले मन हे दुसऱ्या कोणत्या गोष्टीत जायला आहे." नवाब खजिल होवून म्हणाले, "खरे आहे! माझे लक्ष तुम्ही काय करता यात लागले होते. आम्ही देवाकडे काही तरी मागणी करण्यासाठी येतो तर तुम्ही फक्त देवासाठी इथे येता." गुरु नानक म्हणाले,"आपण सारी एकाच ईश्वराची लेकरे, नावे वेगळी दिली तरी देव बदलतो काय? तो सर्व पाहत आहे."
तात्पर्य - ईश्वर एक आहे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी एकाग्र चित्ताची गरज आहे.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon