दैनिक परिपाठ
16 फेब्रुवारी
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
'दैनिक परिपाठ' या सदरात काही सूचना,बदल,सुधारणा आवश्यक असतील तर कृपया comment करावी. आपल्या अमूल्य मताचा आदर केला जाईल.
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
बुद्धीच सर्वश्रेष्ठ
दोन व्यक्ती आपापसात भांडत होत्या. एकजण धनाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही देशाच्या राजाकडे गेले आणि न्याय मागू लागले. राजाही काही निर्णय घेवू शकला नाही. त्याने एक पत्र देवून त्या दोघांना रोमच्या सम्राटाकडे पाठविले.
जेव्हा दोघांनी ते पत्र रोमच्या सम्राटाला दिले तेव्हा त्यातील गोम ओळखून त्याने त्या दोघाना फाशी देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करण्याचे ठरविले. बुद्धीवानाने धनवानास म्हटले,"तू समजतोस धन मोठे आहे तर धनाने आता आपल्या प्राणांची रक्षा कर बघू." धनवानाचे प्रयत्न कामी आले नाहीत. त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली.
बुद्धिवान म्हणाला फाशीवर चढताना आपण एकमेकास पुढे ढकलायचे, पुढील गोष्ट मी सांभाळून घेतो. त्याप्रमाणे त्यांनी केले. प्रथम फाशी जाण्यासाठी दोघे धक्काबुक्की करू लागले तेव्हा रोमच्या सम्राटाने कारण विचारले. बुद्धीवान म्हणाला,"आमच्या राजाला ज्योतिष्याने सांगितले आहे, मी जेथे मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि माझा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल. त्यामुळे मी मरण्याचा विचार करतो कारण लाखो लोक महामारीपासून बचावतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती पण आमच्या राजाने देशावरचे संकट तुमच्या पदरात टाकले आहे. आता कुणाला फाशी देता ते सांगा?" त्या बरोबर रोमच्या सम्राटाने दोघांची सजा माफ केली.
अशा प्रकारे बुद्धीवानाने धनवानाचा जीव स्वतःबरोबर वाचविला.
तात्पर्य - बुद्धी ही सर्वश्रेष्ठ आहे.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon