सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 07 February

  

दैनिक परिपाठ

07 फेब्रुवारी  

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ सुविचार

सत्याने मिळतं तेच टिकतं.

🔺️ दिनविशेष 
१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.

१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

१९७४: ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.

१९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.

१९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान.

२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : वीरगती प्राप्त होणे ,देशासाठी लढताना मरण येणे. 

▪️वाक्य : युद्धात लढताना भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : डोळ्यात केर आणि कानात फुंकर

▪️अर्थ  : रोग एकीकडे आणि उपचार दुसरीकडे. 

🔺️ कोडे 

▪️असे काय आहे जे आपल्याकडे असताना आपण दुसऱ्याला सांगू शकतो पण आपण इतरांना सांगितल्यावर ते आपले राहत नाही? 

▪️उत्तर : गुपित

🔺️ सामान्यज्ञान 

१) भारतात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण ?
- इंदिरा गांधी

२) भारतात पहिली आण्विक चाचणी कधी झाली ?
- १८ मे १९७४

३) कोणत्या नदीला महाकाली म्हणतात ?
- शारदा

४) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव काय ?
- रामजी

५) कोणत्या देशात सर्वात जास्त शेतकरी आहेत ?
- भारत

🔺️ बोधकथा
अर्थ

एक पंडित स्वतःला फार मोठा विद्वान समजत असे. त्याच्या मनात विचार आला की राजाच्या समक्ष राजपुरोहीताशी शास्त्रार्थ केला पाहिजे. मला कोणी हरवू शकत नाही, याचा त्याला गर्व झाला होता. राजपुरोहिताला हरविले की राजाला आपली विद्वत्ता माहित होईल आणि त्याद्वारे राजा आपणास बक्षीस पण देईल असे त्याच्या मनात होते. त्यानुसार ठरवून तो राजदरबारात गेला, त्याने पुरोहिताला शास्त्रार्थ करण्यासाठी आव्हान दिले. राजपुरोहीताने पंडिताला प्रथम प्रश्न विचारण्यास सांगितले, पंडिताने प्रश्न केला,"पाच मी, पाच शी, पाच न मी आणि न शी याचा अर्थ सांगा?" राजपुरोहीताला प्रश्न समजला नाही. त्याने राजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ७ दिवसांची मुदत मागून घेतली. राजाने मुदत दिली.मात्र सात दिवसानंतर मृत्युदंड कबुल असेल तरच.

सात दिवसात पुरोहिताने उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण बुद्धीने,नशिबाने साथ दिली नाही. मोठमोठ्या विद्वानांनाही या प्रश्नाचे उत्तर विचारून पाहिले पण त्यांनाही यातील कुट शोधता आले नाही. राजपुरोहिताने विचाराची दिशा सोडून दिली, आता फक्त मृत्यूचा विचार तो करत होता. मृत्युच्या भीतीने त्याने नगर सोडून दिले, गावाबाहेर चालत राहिला, चालून चालून थकला तेव्हा एका झोपडीपाशी जाऊन बसला.

योगायोगाने ती झोपडी त्या पंडिताची होती आणि तो आपल्या पत्नीशी बोलत होता. पंडित बायकोला प्रश्नाचे उत्तर सांगत होता,"माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने राजपुरोहित मरणार हे खरे ! अगं ! पंधरा तिथीमध्ये पाच तिथी अशा असतात की त्यांच्या पुढे 'मी' प्रत्यय लागतो. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी तसेच पाच तिथी अशा असतात ज्यामध्ये 'शी' प्रत्यय लागतो. एकादशी,द्वादशी,त्रयोदशी,चतुर्दशी आणि पुर्णमाशी आणि पाच तिथीमध्ये मी ही लागत नाही आणि शी हा प्रत्यय लागत नाही.प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि षष्ठी. बघ हे उत्तर राजपुरोहीताला कधीच येणार नाही." हे बाहेरून पुरोहिताने ऐकले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात उत्तर दिले व स्वत:चा जीव वाचविला. अहंकारी पंडिताला राजाने दंड केला.

तात्पर्य - दुसऱ्याला कधीही कमी लेखू नये कारण आपण या ना त्या प्रकारे त्या अवस्थेत जावू शकतो.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »