सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 16

 

ज्ञानकुंभ - 16

शब्दाचा शेवट 'ळ' अक्षराने करा.

बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलन :  WhatsApp Post 

❇️ शुक्रवार दिनांक 06/02/2026

उपक्रम : शब्दाचा शेवट 'ळ' अक्षराने करा.

प्रत्येक शब्दाचा शेवट 'ळ' अक्षराने व्हायला हवा,खालील वर्णनावरून योग्य शब्द शोधा. 

प्रश्नसूची

1......चोवीस तासातील एक प्रहर 

2......कुटण्याचे एक जुने साधन 

3......स्वच्छ 

4......एक फूल 

5......दाट नसलेले 

6.....पांघरुणाचा प्रकार 

7......भरीव नसलेला 

8......आनंदाचा एक प्रकार 

9....अल्लड 

10.....एक ग्रह 

11.....आंघोळीचे भांडे 

12.....याने पाणी घेतात 

13.....हा गुंडाळलेला असतो 

14.....पांढरे कपडे यात उजळतात 

15.....असे पावसाळी वातावरण असते 

16.....ही एखाद्या विषयी वाटते 

17......याला तोटी असते 

18.....हे कापड फाटले की लागते 

19.....ही आगीची लागते 

20......ही पोटात येते 

21......ही पानांची होते 

22......ही साप ओकतो 

23......हा सावत्र आई करते 

24.....हे कष्टाचे मिळते 

25.....हे एकीचे असते 

26......रक्त असे वाहते 

27.....क्रिसमस 

28.....हा चोरीचा येतो 

29.....हे बाळाचे काढतात 

30.....साडीला म्हणतात 

31......सगळे

32......एक फळ 

33.....हे नदीचे विचारू नये

34.....हे ऋषिचे विचारू नये 

35.....एक किचन मधील किटक 

36.....याची पूड चटणी करतात 

उत्तरसूची:-

1.काळ.....चोवीस तासातील एक प्रहर 

2.उखळ....कुटण्याचे एक जुने साधन 

3.नितळ.....स्वच्छ 

4.कमळ....एक फूल 

5.विरळ....दाट नसलेले 

6.वाकळ.....पांघरुणाचा प्रकार 

7.पोकळ ....भरीव नसलेला 

8.निखळ....आनंदाचा एक प्रकार 

9.अवखळ...अल्लड 

10.मंगळ..एक ग्रह 

11.घंगाळ....आंघोळीचे भांडे 

12.ओगराळ....याने पाणी घेतात 

13.रीळ..हा गुंडाळलेला असतो 

14.नीळ....पांढरे कपडे यात उजळतात 

15.ढगाळ....असे पावसाळी वातावरण असते 

16.तळमळ ....ही एखाद्या विषयी वाटते 

17.नळ....याला तोटी असते 

18.ठिगळ....हे कापड फाटले की लागते 

19.लोळ..ही आगीची लागते 

20.कळ....ही पोटात येते 

21.सळसळ.....ही पानांची होते 

22.गरळ.....ही साप ओकतो 

23...छळ...हा सावत्र आई करते 

24.फळ....हे कष्टाचे मिळते 

25.बळ.हे एकीचे असते 

26.सळसळ....रक्त असे वाहते 

27.नाताळ....क्रिसमस 

28.आळ..हा चोरीचा येतो 

29.नाळ..हे बाळाचे काढतात 

30.पातळ..साडीला म्हणतात 

31.सकळ...सगळे

32.केळ...एक फळ 

33.मूळ..हे नदीचे विचारू नये

34.कूळ.हे ऋषिचे विचारू नये 

35.झुरळ एक किचन मधील किटक 

36.तीळ .याची पूड चटणी करतात

Previous
Next Post »