सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 06 February

 

दैनिक परिपाठ

06 फेब्रुवारी  

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ सुविचार

जो स्वत: कुणाचातरी गुलाम असतो : त्यालाच दुसऱ्यावर हुकुमत गाजवाविशी वाटते.

🔺️ दिनविशेष 

१६८५ ला दुसरा जेम्स इंग्लंड चा राजा बनला.

१७७८ ला फ्रांस ने अमेरिकेला राष्ट्र म्हणून मान्यता दिली.

१८८८ ला आजच्या दिवशी गिलिस बिल्दट हे स्वीडन चे प्रधानमंत्री बनले.

१९१८ ला आजच्या दिवशी ब्रिटन मध्ये ३० वर्षाच्या वरील महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला.

१९५२ ला आजच्या दिवशी दुसरी एलिझाबेथ यांनी इंग्लंड ची महाराणी बनली तेव्हा त्या फक्त २६ वर्षाच्या होत्या.

 १९६८ चे दहावे हिवाळी ऑलिम्पिक फ्रान्सच्या ग्रोनेबल येथे सुरु झाले."

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : वनवन करणे - खूप भटकणे. 

▪️वाक्य : राजूने कामासाठी दिवसभर वनवन केली.

🔺️ म्हणी व अर्थ 

▪️म्हण : डोळ्यात केर आणि कानात फुंकर –

▪️अर्थ  : रोग एकीकडे आणि उपचार दुसरीकडे. 

🔺️ कोडे 
उंचापुरा देह, लांबच लांब मान, वाळवंटात चालताना राखतो आपली शान.
उत्तर: उंट

🔺️ सामान्यज्ञान 

१) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ?
उत्तर - जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

२) भारतात पहिले एटीएम कोणत्या बँकेने सुरू केले ?
उत्तर - एचएसबीस

३) उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होणारी महाकाय प्रजाती कोणती ?
उत्तर - डायनोसॉर

४) कोणते सस्तन प्राणी असूनही अंडी घालतात ?
उत्तर - बदकचोच्या, मुंगीखाऊ

५) पाठीचा कणा नसलेले सजीवांना काय म्हणतात ?
उत्तर - अपृष्ठवंशीय सजीव

🔺️ बोधकथा
कोल्हा आणि करकोचा

एका जंगलात एक कोल्हा आणि एक करकोचा राहत होते. ते एकमेकांचे मित्र होते, पण कोल्हा खूप मिश्किल आणि खोडकर स्वभावाचा होता. एकदा कोल्ह्याने करकोच्याला आपल्या घरी जेवायला बोलावले.

​कोल्ह्याने जेवणासाठी एक चविष्ट खीर बनवली. पण खोडकरपणा म्हणून त्याने ती खीर दोन सपाट ताटांमध्ये वाढली. कोल्हा आपल्या जिभेने पटापट खीर चाटू लागला, पण बिचाऱ्या करकोच्याला आपल्या लांब चोचीमुळे सपाट ताटातील खीर अजिबात पिता येईना. कोल्ह्याने विचारले, "काय मित्र, खीर आवडली नाही का?" करकोचा शांत राहिला आणि म्हणाला, "खीर खूप छान झाली आहे, धन्यवाद!"

​काही दिवसांनी करकोच्याने कोल्ह्याला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. कोल्ह्याला वाटले की आता आपल्यालाही मेजवानी मिळेल. करकोच्याने देखील छान सुवासिक जेवण बनवले होते. पण त्याने ते जेवण एका अरुंद आणि लांब मानेच्या सुरईत (भांड्यात) वाढले.

​करकोचा आपली लांब चोच भांड्यात घालून आरामात जेवू लागला. पण कोल्ह्याचे तोंड त्या अरुंद भांड्यात शिरू शकले नाही. कोल्हा फक्त त्या भांड्याचा वास घेत बाहेर उभा राहिला. कोल्ह्याला आपली चूक उमजली आणि तो शरमिंदा झाला.

कथेचे तात्पर्य (Moral of the Story): ​"जसे आपण इतरांशी वागतो, तसेच इतर आपल्याशी वागतात." (किंवा 'जशास तसे' - Tit for Tat.) या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण कोणाचीही चेष्टा करू नये.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »