सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 04 February

  

दैनिक परिपाठ

04 फेब्रुवारी  

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ सुविचार

आनंद वाटा ; आनंद लुटा.

🔺️ दिनविशेष 
२००४ : मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.

२००३ : युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण कर ण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.

१९६१ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान

१९४८ : श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : रस असणे - गाढवाला गुळाची चव काय – 

▪️वाक्य : मूर्ख माणसाला ज्ञानाचे महत्व माहित नसते.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही 

▪️अर्थ  : बाह्य देखाव्याने माणूस हुशार होत नाही.

🔺️ कोडे 
▪️दोन पाय मोठे दोन पाय लहान शेतात राबतो ताकद महान 

▪️उत्तर : ट्रॅक्टर

🔺️ सामान्यज्ञान 
१)भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता ?
उत्तर - किसान कन्या

२) भारतातील पहिली आय.आय.टी. कोणती ?
उत्तर - आय.आय.टी.खरगपूर

३)  पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी सुमारे किती कोटी वर्षे लागली ?
उत्तर - ८० कोटी वर्षे

४) सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह कोणता ?
उत्तर - नेपच्यून 

५) एकपेशीय सजीव कोणत्या नावाने ओळखले जातात ?
उत्तर - आदिजीव

🔺️ बोधकथा
जाणीव 

बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. 

एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. 

खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. 

त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. 

बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणत नव्हता,नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे." 

तात्पर्य - दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते,कदर केली जाते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »