सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 13

 

ज्ञानकुंभ - 13

अक्षरावरून म्हण ओळखा

बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलन : वर्षा चोपदार,मुंबई 

❇️ मंगळवार दिनांक 03/02/2026

● उपक्रम : अक्षरावरून म्हण ओळखा.

उदाहरणार्थ - अ ते मा : अति तेथे माती.

१. दे दे दं  - देखल्या देवा दंडवत.

२. चो म चां - चोराच्या मनात चांदणे.

३. व ते वां - वड्याचे तेल वांग्यावर.

४. पु पा मा स - पुढे पाठ मागे  सपाट.

५. ए ना ध भा चिं. - एक ना धड भाराभर चिंध्या.

६. आ बि ना - आयत्या बिळात नागोबा.

७. अ ना गा पा ध - अडला हरी गाढवाचे पाय धरी.

८. उं मां सा - उंदरास मांजर साक्ष.

९. झा मु स ला - झाकली मूठ सव्वा लाखाची.

१०. वा लं गा  - वासरात‌ लंगडी गाय शहाणी.

११. आ जी बा उ - आयजीच्या जीवावर बायजी‌ उधार.

१२. न फुं सो इ ति गे वा - नळी फुंकीली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.

१३. मा म मा ज - माय‌ मरो मावशी जगो.

१४.दा क का - दाम‌ करी काम.

१५. घ मा चु - ‌घरोघरी‌ मातीच्या चुली.

१६. इ आ ति वि - इकडे आड तिकडे विहीर.

१७. न ल स वि - नकटीच्या लग्नाला सतराशे पन्नास विघ्ने.

१८. क ना त्या ड - कर नाही त्याला डर कशाची?

१९. आ अं घे शिं - आली अंगावर घेतली शिंगावर.

२०. ए  गा बा भा - एक गाव बारा भानगडी.

Previous
Next Post »