सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 02 February

दैनिक परिपाठ

02 फेब्रुवारी  

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ सुविचार 

रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका. शहाणपणाने काम करा.

🔺️ दिनविशेष 

१९६२ : ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो यांची युति

१९५७ : गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.

१९४३ : दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : धडपड करणे - खूप कष्ट करणे. 

▪️वाक्य : बाबा मुलांच्या शिक्षणासाठी खूप धडपड करतात.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : हपापाचा माल गपापा

▪️अर्थ  : छळाने मिळवलेली संपत्ती जास्त काळ टिकत नाही.

🔺️ कोडे 

▪️असं काय आहे, जे कितीही पाऊस आला, तरी भिजत नाही ? 
▪️उत्तर – पाणी

🔺️ सामान्यज्ञान 

१) इंग्लिश खाडी पोहुन जाणारा पहिला भारतीय कोण ?
उत्तर - मिहीर सेन

२) भारतातील पहिला मूकपट कोणता ?
उत्तर - राजा हरिश्चंद्र 

३) भारतातील पहिला बोलपट कोणता ?
उत्तर - आलम आरा

४) कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती सांगा .
उत्तर - कर्ब - 14, काष्ठवलयांचे विश्लेषण 

५) इस्लाम धर्माचे संस्थापक कोण ?
उत्तर - मुहम्मद पैगंबर

🔺️ बोधकथा
मदत

वीरगडचा राजा सूर्यप्रताप दयाळू आणि परोपकारी होता. त्याच्या राज्यातील एका गावात एकेवर्षी पाऊस पडला नाही. दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. त्या गावात रामचरण नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. दुष्काळामुळे त्याच्या घरात खाण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते, राजाने मदत पाठविली पण गावातील मुखियाने आपल्याच लोंकाना त्या मदतीचा लाभ दिला. जेंव्हा रामचरण मदत मागण्यासाठी गेला तेंव्हा मुखिया त्याला रागावला, आणि त्याला हाकलून दिले. रामचरणची पत्नी आणि मुलाने भुकेने तडफडून जीव टाकला. तेंव्हा रामचरणने वैराग्य स्वीकारले आणि एका साधूच्या दलासोबत तो निघून गेला. साधू दिवसभर भिक्षा मागत असत आणि रात्री मादक पदार्थ खावूनपिवून चोऱ्या करीत असत. चुकीच्या संगतीमुळे रामचरणही नकली ज्योतिषी बनून पैसा जमा करीत असे. त्याने दिवसभर फिरून लोकांविषयी माहिती गोळा करत असे व त्या माहितीचा वापर करत रात्री ज्योतिषाचा वेष धारण करून लोंकाना मूर्ख बनवीत असे. जेंव्हा तो ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध झाला तेंव्हा राजा सूर्यप्रताप त्याला भेटण्यासाठी आला. परंतु त्याने येण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहिली, रामचरणचे खरे रूप राजाला समजले, सैनिकांनी रामचरणला पकडून राजापुढे उभे केले, राजाने त्याला या त्याच्या खोट्या वागण्याचे कारण विचारले, तेंव्हा रामचरण म्हणाला,"महाराज ! गावाच्या मुखीयाने तुमच्या पाठविलेल्या मदतीतून जर फक्त दोन भाकरी आणि पाणी जर मला दिले असते तर माझी बायको आणि मुलगा मरण्यापासून वाचले असते. तुमची मदत मिळाली नाही आणि ते दोघे भुकेने तडफडून मेले, ते दोघे जगले असते तर मी असा खोटारडेपणाने कधीच वागलो नसतो. लोकांचे ज्योतिष मी काय बघणार! मला माझे कुटुंब सांभाळता आले नाही, माझी व्यथा समजून घ्या. महाराज ! तुम्ही मदत पाठविली पण आमच्यापर्यंत ती आलीच नाही. आता तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे." त्याचे हे खरे बोलणे पाहता राजाने त्याचे गुन्हे लक्षात घेता त्याला सौम्य शिक्षा दिली व त्यानंतर त्याला त्या गावाचा मुखिया बनविले व जुन्या मुखीयाला कडक शिक्षा केली.

तात्पर्य - संकटग्रस्त व्यक्तीला योग्यवेळी पोहोचलेली मदत योग्य ते कार्य साध्य करते, अन्यथा संकटात सापडलेल्या जीवांचा जीव जाण्याची शक्यता असते. जर कुणी संकटात असेल तर आपण त्याला मदत केलीच पाहिजे.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »