सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 12

 

ज्ञानकुंभ - 12 

'स' अक्षराच्या चौदाखडीवरील शब्द 

बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलन : नंदा परदेशी,धुळे

❇️ सोमवार दिनांक 02/02/2026

● उपक्रम : 'स' अक्षराच्या चौदाखडीवरील शब्द 

१.सरपटणारा प्राणी - साप

२.रंग बदलणारा प्राणी - सरडा

३ वाकडे नाही ते - सरळ

४. देशाचे रक्षण करतात - सैनिक

५.या सणाला तीळगुळ वाटतात - संक्रांत

६. देवापुढे लावतात ती - समई

७  नेहमी - सदा

८. आपल्याला प्रकाश देणारा- सूर्य

९. अवघड नाही ते - सोपे

१०. मित्र - सखा

११. दिसायला चांगले - सुंदर

१२. संध्याकाळ- सांज

१३. एका फुलाचे नाव - सदाफुली

१४. एका फळाचे नाव - सफरचंद

१५. चांगले विचार - सुविचार

१६. एक भित्रा प्राणी - ससा

१७. प्राण्यांचा राजा - सिंह

१८. आरंभ - सुरूवात

१९. एका नदीचे नाव - सरस्वती

२०. आपण याचा एक घटक आहोत - समाज

२१. प्रकाशाच्या मार्गात वस्तू आल्यावर जी पडते - सावली 

२२. खेळाडूंचा - संघ

२३. धान्य पाखडायला वापरतात - सूप 

२४. कचरा भरण्यासाठी वापरतात - संपली

२५. साबणाला इंग्रजीत म्हणतात - सोप 

Previous
Next Post »