
दैनिक परिपाठ
01 फेब्रुवारी
•संकल्पना - वृषाली सुरेश खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
> 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अनु. | Mp3 | लिंक |
1 | राष्ट्रगीत | 
|
2 | प्रतिज्ञा - मराठी | 
|
3 | प्रतिज्ञा - हिंदी | 
|
4 | प्रतिज्ञा - English | 
|
5 | संविधान वाचन | 
|
6 | संविधान गीत | 
|
अनु. | प्रार्थना | लिंक |
1 | देह मंदिर चित्त मंदिर | 
|
2 | हीच अमुची प्रार्थना | 
|
3 | खरा तो एकचि धर्म | 
|
4 | इतनी शक्ती हमे दे दाता | 
|
5 | केशवा माधवा | 
|
6 | सुबह सवेरे लेकर तेरा | 
|
7 | वसे तो देव तुझ्या अंतरी | 
|
8 | देवा तुझे किती सुंदर | 
|
9 | नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा | 
|
10 | हमको मन की शक्ती देना | 
|
अनु. | ऑनलाईन वर्तमानपत्र |
1 | 
|
2 | 
|
3 | 
|
4 | 
|
5 | 
|
6 | 
|
7 | 
|
🔺️ सुविचार
नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
🔺️ दिनविशेष
२००४ : मक्का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.
१९९२ : भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अॅंडरसन याला फरारी घोषित केले.
१९८१ : ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.
१९७९ : १५ वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : धुळीस मिळणे - नष्ट होणे.
▪️वाक्य : मुसळधार पावसाने भाताचे पीक धुळीस मिळाले.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : नाव मोठे लक्षण खोटे.
▪️अर्थ : कार्य मोठे पण प्रत्यक्ष कृती काहीच नाही.
🔺️ कोडे
बाहेरून काटेरी, आतून रसाळ गरे, ओळखा पाहू कोण, चवीला एकदम खरे?
उत्तर: फणस
🔺️ सामान्यज्ञान
१) बालकवी या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या कवीचे मूळ नाव काय ?
उत्तर - त्र्यंबक बापूजी ठोंबरे
२) निवृत्ती रामजी पाटील यांनी कोणत्या नावाने गीते लिहिली ?
उत्तर - पी.सावळाराम
३) कर्नाम मल्लेश्वरीने कुठे झालेल्या ऑलिंपिक मध्ये कास्यपदक मिळवले ?
उत्तर - सिडनी
४) बॉक्सिंग मध्ये भारताला पहिले पदक मिळवून देण्याची कामगिरी कोणी केली ?
उत्तर - विजेंदर सिंह
५) भारताचे पहिले गृहमंत्री कोण?
उत्तर - सरदार वल्लभभाई पटेल
🔺️ बोधकथा
आध्यात्मिक साधनेत रममाण असणारी एक महिला डोंगराळ प्रदेशातून प्रवास करत होती.चालता चालता ती एका ओढ्याकाठी पोहोचली, उन्हात चालून ती दमली होती, तिला तहानही लागली होती, ती ओढ्यापाशी थांबली, गार पाण्याने तोंड धुतले, पाणी प्यायली, आपल्या पिशवीतून खाण्याचे पदार्थ काढले आणि झाल्यावर पुढे निघाली. तेवढ्यात तिला पाण्यात काही मौल्यवान रत्ने दिसली, तिने ती रत्ने उचलून आपल्या पिशवीत ठेवली. दुसऱ्या दिवशी तिला एक प्रवासी भेटला, त्याला भूक लागली होती, तिने आपली पिशवी उघडून त्याला खायला दिले. उघड्या पिशवीत ठेवलेले रत्न प्रवाशाला दिसले त्याने त्या महिलेला मागितले, तिने क्षणाचा विचार ना करता आणि कुठलेही विचार मनात न आणता ते रत्न त्या प्रवाशाला देवून टाकले. प्रवासी आनंदून निघून गेला. त्याला माहित होते की ते रत्न विकून त्याला इतका पैसा मिळेल की त्यात त्याचे आयुष्य सुखात तो सुखात जगू शकेल. पण काही दिवसानंतर तो त्या महिलेला परत भेटला आणि तो तिला शोधात आला होता. त्याने त्या महिलेला ते रत्न परत केले आणि म्हणाला," तुमच्याकडून रत्न घेतल्यावर अगदी नि:स्पृहपणे ते रत्न देतानाचा तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा दिसत होता. इतक्या सहजपणे तुम्ही ते मौल्यवान रत्न मला दिले आणि ते मी घेतले पण त्याने मला शांती दिली नाही. पैसा मी हि करू शकलो असतो त्या रत्नाचा पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रत्न देताना जी शांती ठेवली होती ती मला गप्प बसू देत नव्हती. कृपा करून मला या रत्नापासून सुटका द्या आणि तुमच्या अध्यात्मिक अनुभूतीमधून मला शांती मिळवून द्या"
तात्पर्य - मनशांती मिळवण्यासाठी पैसा उपयोगी पडत नाही, त्यासाठी मन मोठे, उदार असावे लागते तेंव्हाच मनशांती मिळते.
अनु. | बोधकथा | लिंक |
1 | गोष्टींचा खजिना | 
|
2 | वाचू आनंदे गडे! | 
|
3 | छान छान गोष्टींचा संग्रह | 
|
4 | थोरांच्या आठवणी | 
|
5 | चांदोबा | 
|
6 | किशोर मासिक | 
|
7 | श्यामची आई | 
|
8 | रूम टू रीड | 
|
9 | ई - साहित्य प्रतिष्ठान | 
|
10 | अवांतर वाचनाची पुस्तके SCERET | 
|
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
अनु. | ध्यान साधना (मित्र उपक्रम) | लिंक |
1 | आनापान ध्यान - मराठी | 
|
2 | आनापान ध्यान - हिंदी | 
|
3 | आनापान ध्यान - English | 
|
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
ConversionConversion EmoticonEmoticon