सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 29 January

   

दैनिक परिपाठ

29 जानेवारी 

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ सुविचार 
चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

🔺️ दिनविशेष 
१९७५ : इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ’ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

१८८६ : कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.

१८६१ : कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : दिवस पालटणे - चांगले दिवस येणे. 

▪️वाक्य : पाऊस पडल्यावर शेतकऱ्याचे दिवस पालटले.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : नाचता येईना अंगण वाकडे 

▪️अर्थ  : स्वतःला काही येत नसताना दुसऱ्यात दोष काढणे.

🔶️ कोडे
● उंचापुरा देह, लांबच लांब मान, वाळवंटात चालताना राखतो आपली शान.
​उत्तर: उंट

🥇सामान्यज्ञान 
०१)  गुजरात राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे ?
उत्तर - आशियाई सिंह.

०२) दाल हे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर - जम्मू काश्मीर.

०३) इजिप्त या देशाची राजधानी कोणती आहे ?
उत्तर - कैरो.

०४) गुजगोष्टी या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
उत्तर - ना.सी.फडके.

०५) प्रोटॉनचा शोध कोणी लावला ?
उत्तर - अर्नस्ट रूदरफोर्ड.



🔺️ बोधकथा
कोणती भाषा सर्वात श्रेष्ठ?

एकदा अकबर बादशहाच्या दरबारात एक विद्वान पंडित आला. त्याला अनेक भाषा अवगत होत्या—संस्कृत, अरबी, फारसी, तेलगू, मराठी आणि हिंदी. तो इतक्या सफाईने बोलायचा की, त्याची मूळ मातृभाषा कोणती आहे हे ओळखणे अशक्य होते.

​पंडिताने बादशहाला आव्हान दिले, "महाराज, तुमच्या दरबारात अनेक बुद्धिमान लोक आहेत. जर कोणी माझी मातृभाषा कोणती आहे हे अचूक ओळखले, तर मी त्याला सर्वश्रेष्ठ मानिन."

​अकबर बादशहाने दरबाऱ्यांकडे पाहिले, पण कोणालाही काही कळेना. शेवटी ही जबाबदारी नेहमीप्रमाणे बिरबलावर सोपवण्यात आली. बिरबलाने शांतपणे सांगितले, "महाराज, मला थोडा वेळ हवा आहे. मी उद्या सकाळी याचे उत्तर देईन."

बिरबलाची युक्ती

​त्या रात्री, जेव्हा तो पंडित गाढ झोपला होता, तेव्हा बिरबल चोरपावलांनी त्याच्या खोलीत गेला. बिरबलाने एक गवताची काडी घेतली आणि झोपलेल्या पंडिताच्या कानात फिरवली.

​कानात खाज सुटल्यामुळे पंडिताची झोपमोड झाली. झोपेतून दचकून जागे होताच तो रागात जोरात ओरडला: ​"एवरु अदि? नाकु निद्र रावट लेदु!" (हे कोण आहे? मला झोपू द्या!)

बिरबल तिथून गुपचूप निघून गेला.

दुसऱ्या दिवशी दरबार सकाळी दरबारात बिरबलाने जाहीर केले, "महाराज, या पंडिताची मातृभाषा तेलगू आहे."

​तो पंडित चकित झाला! त्याने मान्य केले की बिरबल अगदी बरोबर बोलला आहे. अकबराने विचारले, "बिरबल, तुला हे कसे समजले?"

​बिरबल हसून म्हणाला, "महाराज, माणूस कितीही भाषा शिकला तरी, जेव्हा तो संकटात असतो किंवा गाढ झोपेतून अचानक जागा होतो, तेव्हा तो नेहमी त्याच्या मातृभाषेतच बोलतो!"

​बादशहा बिरबलाच्या या चातुर्यावर खूप प्रसन्न झाले.

तात्पर्य: ​कितीही मोठे संकट आले तरी शांत डोक्याने आणि निरीक्षणाने त्यावर मार्ग काढता येतो.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »