ज्ञानकुंभ - 09
'झ' अक्षराने सुरू होणारे शब्द
🔶️ लेखन : जयश्री संजय माने,मुंबई
❇️ गुरुवार दिनांक 29/01/2026
● उपक्रम : 'झ' अक्षराने सुरू होणारे शब्द सांगा.
१) मुलींचा प्रसिध्द खेळ... झिम्मा
२) पायघोळ अंगरखा... झगा
३) भांडण... झगडा
४) अतिशय तलम कापड ... झारीपाट
५) खोपट... झोपडी
६) एकालाही न सोडता... झाडून
७) वृक्ष... झाड
८) घर साफ करण्यासाठी वापरतात... झाडू
९) हा सिगारेटचा असतो... झुरका
१०) छोटी खिडकी... झडप
११) पुरूषांचा पेहराव... झब्बा
१२) एक कीटक ... झुरळ
१३) तीव्र उन्हाची बसते...झळ
१४) वादळ... झंजावात
१५) लहान मुलांचा कपडा.. झबले
१६) बागेला पाणी घालण्याचे साधन... झारी
१७) ही तीव्र उन्हात बसते... झळ
१८) भजनासाठी आवश्यक... झांज
१९) मिरचीचे विशेषण... झणझणीत
२०) पेंग येणे... झोप
२१) विस्कटलेले केस... झिपऱ्या
२२) एक फूल... झेंडू
२३) दिव्याची तिरीप... झोत
२४) उंच माझा... झोका
२५) स्वच्छता... झाडझुड
२६) पाण्याचा छोटा प्रवाह... झरा
२७) डब्याला हे असतं... झाकण
२८) जेवणानंतरची आवराआवरी... झाकापाक
२९) ही फ्रॉकला असते... झालर
३०) ही हृदयाला असते... झडप

ConversionConversion EmoticonEmoticon