सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 30 January

 

दैनिक परिपाठ

30 जानेवारी 

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ सुविचार 

केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

🔺️ दिनविशेष 
१९९४ : पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.

१९४८ : नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ ’महात्मा’ गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.

१९३३ : अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : देखरेख करणे - राखण करणे. 

▪️वाक्य : मनोज घराची खूप चांगली देखरेख करतो.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही 

▪️अर्थ  : बाह्य देखाव्याने माणूस हुशार होत नाही.

🔺️ कोडे 
तोंड नाही पण बोलतो, पाय नाही पण चालतो, सांगा पाहू कोण?
​उत्तर : रेडिओ / मोबाईल

🔺️ सामान्यज्ञान 
०१) महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे ?
- केगाव (सोलापूर)

०२) 'गुगली' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- क्रिकेट

०३) भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोण ?
- विक्रम साराभाई

०४) भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे ?
- सिंधुदुर्ग

०५) मनोज तुली हा कलावंत कोणत्या नावाने ओळखला जातो ?
- कुमार गौरव



🔺️ बोधकथा
दोन भांडी

एका नदीच्या काठावर दोन भांडी पडली होती.एक तांब्याचे आणि दुसरे मातीचे.

​अचानक नदीला पूर आला आणि दोन्ही भांडी पाण्यात वाहू लागली. तांब्याचे भांडे मातीच्या भांड्याला म्हणाले, "मित्रा, तू घाबरू नकोस. तू माझ्या जवळ ये, मी तुझे रक्षण करीन. मी मजबूत आहे, तुला काही होऊ देणार नाही."

​मातीचे भांडे हसून म्हणाले, "तुझ्या मदतीबद्दल धन्यवाद! पण मी तुझ्यापासून जितके लांब राहीन, तितकेच मी जास्त सुरक्षित राहीन."

​तांब्याच्या भांड्याला नवल वाटले. मातीचे भांडे पुढे म्हणाले, "जर आपण एकमेकांवर आदळलो, तर तू मजबूत असल्यामुळे तुला काही होणार नाही, पण तुझे एक धक्केही माझे तुकडे-तुकडे करतील म्हणून अंतर ठेवलेलेच बरे!"

तात्पर्य: ​शक्तीशाली माणसांशी मैत्री करताना नेहमी सावध राहावे, कारण त्यांच्याशी झालेली साधी टक्करही आपला विनाश करू शकते.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »