दैनिक परिपाठ
26 जानेवारी
•संकल्पना - वृषाली सुरेश खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
> 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
०१) महाराष्ट्रात पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था कोठे आहे ?
- छत्रपती संभाजीनगर.
०२) रविंद्रनाथ टागोर यांचे प्रचलित नाव कोणते आहे ?
- विश्व कवी.
०३) महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
- राहूरी.(अहिल्यानगर)
०४) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण ?
- लॉर्ड रिपन.
०५) भारतातील सर्वांधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे ?
- उत्तरप्रदेश.
कावळा आणि साप
एका खूप जुन्या वडाच्या झाडावर कावळ्याचं एक जोडपं सुखाने राहत होतं. त्याच झाडाच्या ढोलीत (पोकळीत) एक दुष्ट काळा सापही येऊन राहू लागला.
जेव्हा कधी कावळी अंडी घालायची, तेव्हा कावळा बाहेर गेल्याची संधी साधून तो साप झाडावर चढायचा आणि अंडी खाऊन टाकायचा. यामुळे कावळ्याचं जोडपं खूप दुःखी झालं होतं. सापाशी ताकदीने लढणं त्यांना शक्य नव्हतं, कारण साप मोठा आणि विषारी होता.
एके दिवशी कावळा आपल्या चतुर मित्राकडे, म्हणजेच कोल्ह्याकडे गेला आणि त्याला आपली समस्या सांगितली. कोल्हा हसून म्हणाला, "मित्रा, ताकदीपेक्षा बुद्धी मोठी असते. तू फक्त मी सांगतो तसं कर."
कोल्ह्याने एक योजना सांगितली. जवळच असलेल्या नदीवर राजकन्या स्नानासाठी येत असे. कोल्हा म्हणाला, "राजकन्या जेव्हा स्नानासाठी पाण्यात जाईल, तेव्हा तिने काठावर ठेवलेला तिचा सोन्याचा मौल्यवान हार तू चोचीत पकडून पळ आणि तो हार त्या सापाच्या ढोलीत नेऊन टाक."
कावळ्याने अगदी तसंच केलं. राजकन्येचा हार घेऊन तो उडाला. राजवाड्याचे सैनिक त्याच्या मागे धावले. कावळ्याने तो हार सापाच्या ढोलीत टाकला आणि स्वतः झाडाच्या फांदीवर जाऊन बसला.
जेव्हा सैनिकांनी ढोलीत हार काढण्यासाठी हात घातला, तेव्हा तिथे असलेला साप फुत्कारत बाहेर आला. स्वतःच्या रक्षणासाठी सैनिकांनी त्या सापाला मारून टाकले आणि आपला हार घेऊन निघून गेले. अशा प्रकारे, कावळ्याने बुद्धीच्या जोरावर आपल्या शत्रूचा कायमचा काटा काढला.
तात्पर्य: ज्या ठिकाणी शारीरिक शक्ती कमी पडते, तिथे बुद्धीचा चातुर्याने वापर केल्यास मोठ्या संकटावरही मात करता येते.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon