सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 25 January

   

दैनिक परिपाठ

25 जानेवारी 

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ सुविचार 
उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

🔺️ दिनविशेष 

२००१ : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ’भारतरत्‍न’

१९९५ : अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे, असा संशय रशियन अधिकार्‍यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे डागण्यासाठी ’न्युक्लिअर ब्रिफकेस’ हातात घेतेली होती!

१९९१ : मोरारजी देसाई यांना ’भारतरत्‍न’

१९८२ : आचार्य विनोबा भावे यांना ’भारतरत्‍न’

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : मुठीत असणे- ताब्यात असणे. 

▪️वाक्य : हे सर्व पोलिस स्टेशन इन्स्पेक्टर म्हणून माझ्या मुठीत आहे.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : काकडीची चोरी फाशीची शिक्षा 

▪️अर्थ  : अपराध खूप लहान पण त्याची शिक्षा मात्र खूप मोठी. 

🔺️ कोडे 
▪️असे कोणते फळ आहे जे बाजारात विकले जात नाही? 

▪️उत्तर: मेहनतीचे फळ

 🔶️ सामान्यज्ञान 
०१) न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ?
- सर जेम्स चँडविक.

०२) युरोपचे क्रीडांगणाचा देश कोणता आहे ?
- स्वित्झर्लंड.

०३) खोजीहार हे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
- हिमाचल प्रदेश.

०४) भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी पासून सुरू झाली ?
- २६ जानेवारी १९५०.

०५) केनिया या देशाची राजधानी कोणती आहे ?
- नैरोबी.



🔺️ बोधकथा

          खरा आनंद

एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहायचा. त्याच्याकडे गडगंज संपत्ती होती, पण त्याच्या मनात शांती नव्हती. तो सतत अस्वस्थ असायचा. 'आनंद' शोधण्यासाठी तो अनेक ठिकाणी फिरला, पण त्याला समाधान मिळाले नाही.

​शेवटी तो एका साधूकडे गेला आणि म्हणाला, "महाराज, माझ्याकडे सर्व काही आहे, पण मला सुख आणि शांती मिळत नाही. खरा आनंद कुठे मिळेल?"

साधू हसले आणि म्हणाले, "मी तुला आनंदाचा पत्ता सांगतो, पण त्याआधी तू माझ्यासाठी एक काम करशील का? हा पाण्याचा पेला घे आणि या गावातल्या सगळ्यात गरीब माणसाला देऊन ये, पण अट एकच - पेला सांडता कामा नये."

व्यापारी पेला घेऊन निघाला. त्याचे संपूर्ण लक्ष त्या पेल्याकडे होते. त्याने तो पेला एका झोपडीत राहणाऱ्या गरीब माणसाला दिला आणि परत आला.

साधूने विचारले, "व्यापारी महोदय, रस्त्यात तुम्हाला काय काय दिसले? कोणाची भांडणे दिसली? कोणाचे उत्सव दिसले?"

व्यापारी म्हणाला, "महाराज, माझे पूर्ण लक्ष फक्त पेल्यातल्या पाण्याकडे होते. त्यामुळे मला आजूबाजूला काय चालले आहे, याकडे लक्षच देता आले नाही.

​साधू म्हणाले, "हेच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. जेव्हा तू तुझ्याकडे असलेल्या गोष्टींचा (पाण्याचा) सांभाळ करण्यात आणि दुसऱ्याला मदत करण्यात पूर्णपणे मग्न असतोस, तेव्हा बाह्य जगातील गोंधळ तुला त्रास देऊ शकत नाही. दुसऱ्यासाठी काहीतरी करण्यात जो एकाग्र भाव असतो, त्यातच खरा आनंद दडलेला असतो."

व्यापारी समजून चुकला की, संपत्ती साठवण्यात नाही, तर ती इतरांच्या कामी लावण्यात आणि वर्तमानात जगण्यातच खरी शांती आहे.

​तात्पर्य: खरा आनंद वस्तूंत नसून आपल्या मनाच्या एकाग्रतेत आणि परोपकारात असतो.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »