ज्ञानकुंभ - 07
शेवटी 'न','ण' येणारे शब्द
🔶️ लेखन : ज्योती दुर्गे-भेगडे, पुणे
❇️ सोमवार दिनांक 26/01/2026
● उपक्रम : शेवटी 'न','ण' येणारे शब्द
1) रोज जेवतो ते - अन्न
2) मातीतील छोटाशा भाग - कण
3) ज्यावर लढाई होते ते - रणांगण
4) आनंदाने साजरे होणारे - सण
5) खूप झाडे असणारे - वन
6) ऐकण्यासाठी वापरतो तो अवयव - कान
7) सगळ्यांपेक्षा लहान - सान
8) इतरांच्या बोलण्याने दुखावले जाणारे - मन
9) मानवी शरीर - तन
10) दुस-यांना मोफत दिले जाते - दान
11) वहीचे निखळलेले - पान
12) धनुष्यातून सोडले जाणारे - बाण
13) मोठ्यांना आदराने दिला जातो - मान
14) आपल्या देशाविषयी आपल्याला वाटणारा - अभिमान
15) एखाद्या विषयात अतिशय ज्ञान असणारा - प्रविण
16) वाहणारा वारा - पवन
17) जल,नीर,तोय,पाणी - जीवन
18) शांतता राखणे - मौन
19) दहा तोंड असणारा - रावण
20) पाण्याने भागते ती - तहान
21) पायात घातली जाते ती - वहान
22) आईची घेतली जाते ती - आण
23) डोके व धड जोडणारा भाग - मान
24) झाडाचे हिरवे - पान
25) शंकराला वाहिले जाणारे - बेलाचे पान
26) आकाशात उडणारे - विमान
27) वस्तुंचे ऐकमेकांवर होणारे - घर्षण
28) देवाचे घेतले जाणारे - दर्शन
29) विविध साहित्याचे मांडले जाणारे - प्रदर्शन
30) एखाद्या गोष्टीसाठी सर्वस्व देणे - समर्पण
31) चेहरा पाहण्यासाठी वापरले जाणारा - दर्पण
32) विविध पुरस्काराने केला जाणारा - सन्मान
33) एखाद्या गोष्टीची माहिती देणे - ज्ञान
34) एखादी गोष्ट माहीत नसणे - अज्ञान
35) ज्ञानेश्वरांनी लिहिलेले - पसायदान
36) शाळा,कॉलेज मध्ये दिले जाणारे- शिक्षण
37) अणू व रेणूचे - कण
38) श्रवणेंद्रिय - कान
39) पुस्तकातील धडा मोठ्याने वाचणे - प्रकटवाचन
40) दुस-याचे बोलणे / मधुर संगीत ऐकणे - श्रवण

ConversionConversion EmoticonEmoticon