
दैनिक परिपाठ
27 जानेवारी
•संकल्पना - वृषाली सुरेश खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
> 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अनु. | Mp3 | लिंक |
1 | राष्ट्रगीत | 
|
2 | प्रतिज्ञा - मराठी | 
|
3 | प्रतिज्ञा - हिंदी | 
|
4 | प्रतिज्ञा - English | 
|
5 | संविधान वाचन | 
|
6 | संविधान गीत | 
|
अनु. | प्रार्थना | लिंक |
1 | देह मंदिर चित्त मंदिर | 
|
2 | हीच अमुची प्रार्थना | 
|
3 | खरा तो एकचि धर्म | 
|
4 | इतनी शक्ती हमे दे दाता | 
|
5 | केशवा माधवा | 
|
6 | सुबह सवेरे लेकर तेरा | 
|
7 | वसे तो देव तुझ्या अंतरी | 
|
8 | देवा तुझे किती सुंदर | 
|
9 | नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा | 
|
10 | हमको मन की शक्ती देना | 
|
अनु. | ऑनलाईन वर्तमानपत्र |
1 | 
|
2 | 
|
3 | 
|
4 | 
|
5 | 
|
6 | 
|
7 | 
|
🔺️ सुविचार
जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची काळजी घ्या.
🔺️ दिनविशेष
१९७३ : पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.
१९६७ : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.
१९४५ : दुसरे महायुद्ध – रशियाच्या ’रेड आर्मी’ने पोलंडमधील ’ऑस्विच’ येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.
१९४४ : दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.
१८८८ : वॉशिंग्टन डी. सी. येथे ‘द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी’ची स्थापना
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : मार्ग काढणे - रस्ता काढणे, मार्ग काढणे.
▪️वाक्य : जंगलातून जात असताना सुजयने मार्ग काढला.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : आंधळा मागतो एक डोळा देव देतो
▪️अर्थ : दोन डोळे अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे.
🔺️ कोडे
▪️सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार किंवा रविवार हे शब्द न वापरता आपण सलग तीन दिवसांची नावे सांगू शकतो का?
▪️उत्तर – हो. काल,आज आणि उद्या.
🔺️ सामान्यज्ञान
१) जळगाव जिल्हा ---- या फळांसाठी राज्यात प्रसिद्ध आहे.
उत्तर - केळी
२) जळगाव जिल्ह्यातील कोणते थंड हवेचे स्थळ राज्यात प्रसिध्द आहे?
उत्तर - पाल
३) आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे लोकोमोटीव्ह शेड भारतातील कोणत्या रेल्वे स्थानकावर आहे ?
उत्तर - भुसावळ
४) जळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी अभयारण्य आहे ?
उत्तर - यावल
५) मंगळवेढा येथे शामा नायकीणीच्या पोटी जन्माला आलेली विठ्ठल भक्त संत कोण?
उत्तर - संत कान्होपात्रा
🔺️ बोधकथा
गर्व आणि नम्रता (वारा आणि सूर्य)
एके दिवशी वारा आणि सूर्य यांच्यात मोठी चढाओढ लागली. वाऱ्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता. तो सूर्याला म्हणाला, "मी तुझ्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे. बघ, मी हवे तर झाडे उपटून टाकू शकतो!"
सूर्य शांतपणे हसून म्हणाला, "शक्ती फक्त नष्ट करण्यात नसते, तर कोणाचे तरी मन जिंकण्यात असते."
त्याच वेळी रस्त्यावरून एक प्रवासी अंगावर घट्ट कोट घालून चालला होता. दोघांनी एक पैज लावली: जो या प्रवाशाचा कोट अंगातून काढायला लावेल, तोच खरा शक्तीवान!
वाऱ्याचा प्रयत्न
सुरुवातीला वाऱ्याने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली. तो खूप जोराने वाहू लागला. त्याला वाटले की वाऱ्याच्या झोतात कोट आपोआप उडून जाईल. पण वारा जितक्या जोरात वाहू लागला, तितक्याच घट्टपणे त्या प्रवाशाने आपला कोट धरून ठेवला. वारा थकून गेला, पण त्याला यश आले नाही.
सूर्याचा प्रयत्न
आता सूर्याची पाळी होती. सूर्य ढगांआडातून बाहेर आला आणि त्याने आपली उबदार किरणे जमिनीवर सोडली. हळूहळू ऊन वाढू लागले. प्रवाशाला थोडी उष्णता जाणवू लागली. त्यानंतर सूर्याने आपले तेज अजून वाढवले. उष्णता असह्य झाल्यामुळे प्रवाशाला घाम फुटला. त्याने लगेच स्वतःहून आपला कोट काढला आणि हातावर घेतला.
तात्पर्य : "गर्वाचा नेहमी पराभव होतो. जे काम शक्तीने होत नाही, ते प्रेमाने आणि नम्रतेने सहज शक्य होते."
अनु. | बोधकथा | लिंक |
1 | गोष्टींचा खजिना | 
|
2 | वाचू आनंदे गडे! | 
|
3 | छान छान गोष्टींचा संग्रह | 
|
4 | थोरांच्या आठवणी | 
|
5 | चांदोबा | 
|
6 | किशोर मासिक | 
|
7 | श्यामची आई | 
|
8 | रूम टू रीड | 
|
9 | ई - साहित्य प्रतिष्ठान | 
|
10 | अवांतर वाचनाची पुस्तके SCERET | 
|
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
अनु. | ध्यान साधना (मित्र उपक्रम) | लिंक |
1 | आनापान ध्यान - मराठी | 
|
2 | आनापान ध्यान - हिंदी | 
|
3 | आनापान ध्यान - English | 
|
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
ConversionConversion EmoticonEmoticon