सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 23 January

 

दैनिक परिपाठ

23 जानेवारी 

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ सुविचार 
निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

🔺️ दिनविशेष 
१९९७ : मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.

१९७३ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.

१९६८ : शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.

१९४३ : दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने त्रिपोली (लिबीयाची राजधानी) शहर जिंकले.

१९३२ : ’प्रभात’च्या ’अयोध्येचा राजा’ची हिन्दी आवृत्ती ’अयोध्याका राजा’ मुंबईत प्रदर्शित झाली.

१८४९ : डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : बेत करणे - योजना आखणे. 
▪️वाक्य : आज आईने पोळ्यांचा बेत केला.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही 

▪️अर्थ  : बाह्य देखाव्याने माणूस हुशार होत नाही.

🔺️ कोडे 
▪️आहे मला मुख,परंतु खात नाही, 
दिसते मी झोपलेली,पण असते पळतही, 
माझ्याशिवाय तुमचे,जगणेच शक्य नाही 
वहा तुम्ही माझी,थोडीशी काळजीही, 
मी कोण काढा शोधुन,नाहीतर बें म्हणा मागून?  

▪️उत्तर: नदी 

🔺️ सामान्यज्ञान 
१) मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या ?
उत्तर - अन्न,पाणी, वस्त्र, निवारा

२) ऊर्जा म्हणजे काय?
उत्तर - कार्य करण्यासाठी लागणारे क्षमता किंवा शक्ती .

३) मानवाने कोणत्या प्रकारची घरे बांधली पाहिजेत ?
उत्तर - कायमस्वरूपी परंतु पर्यावरण पूरक

४) प्रदूषणाचे प्रकार सांगा .
उत्तर - जल प्रदूषण,वायू प्रदुषण,ध्वनी प्रदूषण,मृदा प्रदूषण

५) मानवाच्या सामाजिक समस्या सांगा .
उत्तर - दारिद्र्य ,बेरोजगारी, बेघरपणा, लोकसंख्या वाढ


🔺️ बोधकथा

लालसा 

एका गावात चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. इकडे तिकडे फिरत असता गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि झाडाला बांधून ठेवले. मग गावकरी विचार करू लागले, याला काय शिक्षा द्यावी? का गावातील मुख्य माणसाला विचारावे? या विचारातून असे ठरले की मुख्य माणसाला बोलावून आणायचे आणि चोराला शिक्षा करायची.सगळे गावकरी त्या चोराला एकटे त्या झाडाला बांधून मुख्य माणसाला बोलावण्यास गेले. 

काही वेळ गेल्यावर त्या रस्त्याने एक मेंढपाळ जात होता, त्याने त्या चोराला झाडाला बांधलेले पाहिले, त्याला उत्सुकता वाटली त्याने त्या चोराला विचारले, "तू कोण आहेस?" तुला असे कोणी बांधून ठेवले आहे? तू काय गुन्हा केला आहेस?" चोराने विचार केला ही सुटायची चांगली संधी चालून आली आहे. चोर म्हणाला, "अरे काय सांगू मित्रा ! मी आहे एक फकीर ! इथे काही चोर आले होते. लोकांची लुट करून ते धन मिळवतात आणि त्याचे पाप लागायला नको म्हणून त्यातील काही धन दान करतात.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना कुणी फकीर दानासाठी गाठ पडला नव्हता. ते धन घ्या म्हणत होते पण कुणी त्यांचे धन घेतच नव्हते. अशातच त्यांनी त्यांनी मला दान घ्यावे म्हटले पण मी नकार देताच त्यांनी मला मारहाण केली व या झाडाला बांधून ठेवले आहे व ते परत येथे येवून मला धनदान करूनच मग पुढे जाणार आहेत." हे ऐकताच मेंढपाळाच्या मनात धनाच्या बाबतीत लोभ निर्माण झाला. तो चोराला म्हणाला, "भाऊ! तू फकीर ! तुला धनाचा काय फायदा! तू ते घेणारही नाहीस, त्यापेक्षा आता अंधाराची वेळ झाली आहे तू त्याचा फायदा घे आणि पळून जा. तुझ्या जागेवर मला बांधून ठेव. अंधार असल्याने ते तू समजून मला धन देतील आणि माझी गरिबीपण हटेल." चोराने तसेच केले. आपल्या जागी मेंढपाळाला बांधून तो पळून गेला. 

तिकडे गावकरी मुख्य माणसाकडून चोराला समुद्रात फेकून देण्याचा आदेश घेवून आले. त्यांनी चोराची शहानिशा न करता व अंधार असल्याने चोराचा चेहरासुद्धा न पाहता त्याला समुद्रात फेकून दिले. अशा त-हेने धनलोभाने एका गरीबाचा जीव गेला.

तात्पर्य-कोणत्याही गोष्टीचा लोभ चांगला नाही, लोभामुळे आत्मघात होण्याची शक्यता असते. त्यापासून दूर राहणे हेच बरे!

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Previous
Next Post »