सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 04

 

ज्ञानकुंभ - 04 
 बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

शेवटी 'त्र' असलेले शब्द 

🔶️ लेखन : वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई

❇️ गुरुवार दिनांक 22/01/2026

●उपक्रम : शेवटी 'त्र' असलेले शब्द शोधा.

 1) सखा - मित्र

 2) लक्ष्मणाचे दुसरे नाव - सुमित्र

 3) अग्नी सतत प्रज्वलित असणे - अग्निहोत्र

 4) सगळीकडे - सर्वत्र

 5) पंचगव्यातील एक - अत्र

 6) महाभारतातील लढाई झाली ते ठिकाण - कुरूक्षेत्र

 7) अभ्यासक्रमातील ६ महिन्याचा काळ - सत्र

8) मुलगा - पुत्र

9) विद्यार्थी - छात्र

10) कारस्थान - षड्यंत्र

  11) केवळ/फक्त - मात्र

12) गणितातील नियम - सूत्र

13) डोळे - नेत्र

14) नाटकातील कलाकार - पात्र

15) श्लोक - स्तोत्र

16) निशा - रात्र

17) विज्ञान - शास्त्र

18) तारे, ग्रह - नक्षत्र

19) चालचलन - चरित्र

20) एक ऋषी - विश्वामित्र

  21) टपाल - पत्र

22) कापड - वस्त्र

23) पूर्वज /ऋषी कडून चालत आलेले कुळ - गोत्र

24) धर्मार्थ अन्न मिळण्याचे ठिकाण - अन्नछत्र

25) हत्यार - अस्त्र

26) सख्खे नसलेले - सावत्र

27) विक्षिप्त - विचित्र

28) शुभ/पावन - पवित्र

29) सौभाग्यलेणे - मंगळसूत्र

30) हजार - सहस्त्र

Previous
Next Post »