ज्ञानकुंभ - 05
'च' ची चौदाखडी शब्द
🔶️ लेखन : वृषाली सुरेश खाड्ये,मुंबई
❇️ शुक्रवार दिनांक 23/01/2026
● उपक्रम : 'च' ची चौदाखडी शब्द शोधणे.
1) खाद्यपदार्थ वाढण्यासाठी उपयोगी पडणारे भांडे - चमचा
2) पक्ष्यांचे तोंड - चोच
3) चोरी करणारा - चोर
4) सोन्याबरोबर याचेही दागिने बनवतात - चांदी
5) अन्नाचा एक घास दाताने 32 वेळा असा खावा - चावून चावून
6) टेबलाला पाय असतात - चार
7) भेग - चीर
8) आई मुलाची माफ करते - चूक
9) वस्तू पकडण्यासाठी वापरतात - चिमटा
10) पौर्णिमेच्या रात्री टिपूर पडते - चांदणे
11) मुलांचा काल्पनिक मामा - चांदोमामा
12)जीभेने पदार्थाची कळते - चव
13) मुलांनी हे खाल्ले की दात किडतात - चाॅकलेट
14) WhatsApp वरील गप्पा - चॅट
15) चिमणीचा आवाज - चिवचिव
16) चार रस्ते एकत्र मिळतात तो - चौक
17) पहारेकरी - चौकीदार
18) शिष्य - चेला
19) कमतरता,उणीव - चणचण
20) मराठी वर्षाचा पहिला महिना - चैत्र
21) भुताटकी - चेटूक
22) बिछान्यावर अंथरतात - चादर
23)पाव भाग- चतकोर
24) एक पक्षी- चकोर,चिमणी
25) स्पर्धा - चुरस
26) खाण्याच्या पानाला आजी लावते - चुना
27) दिवाळीत बनवला जाणारा पदार्थ - चकली, चिवडा
28) मोची वापरतात ते बारीक खिळे - चुका
29) एक पालेभाजी - चाकवत
30) एक कडधान्य - चवळी
31) सरसर चढणारी खारूताई-
32) द्यावी घ्यावी.(दुकानात वाचायला मिळणारे वाक्य) - चूकभूल
33) इंग्रजीत face - चेहरा
34) उधळपट्टी - चैन
35) व्यवहार असा असावा - चोख

ConversionConversion EmoticonEmoticon