दैनिक परिपाठ
17 जानेवारी
•संकल्पना - वृषाली सुरेश खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
> 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
दु:ख कवटाळत बसू नका ; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
🔺️ दिनविशेष
२००१ : अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ’सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
२००१ : कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर
१९५६ : बेळगाव – कारवार आणि बिदर या जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा
१९४६ : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.
❇️ वाक्प्रचार व अर्थ
▪️वाक्प्रचार व अर्थ : प्रशंसा करणे - स्तुती करणे.
▪️वाक्य : अक्षय ने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याची सर्व शिक्षकांनी प्रशंसा केली.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : अर्थी दान महापुण्य
▪️अर्थ : गरजूंना दान करणे हे पुण्य काम आहे.
🔺️ कोडे
▪️वाचण्यात आणि लिहिण्यात दोन्ही ठिकाणी असते माझे काम. मी नाही कागद मी नाही पेन. सांगा काय आहे माझं नाव?
▪️उत्तर- चष्मा
🔺️ बोधकथा
व्यवस्थापन
संत राबिया रोज पक्ष्यांना धान्याचे दाणे टाकीत असत. हा त्यांचा रोजचा नियम होता. उर्वरित वेळेत त्या अध्ययन आणि अध्यात्मिक चर्चा करीत असत. एके दिवशी त्या सकाळी कबुतरांना दाणे टाकीत असताना, पाच-सहा तरुण तेथे फिरत फिरत आले आणि संत राबिया यांच्याजवळ येऊन उभे राहिले. संत राबियानी त्याच्यांकडे पाहून स्मितहास्य केले आणि नंतर मोठ्याने हसू लागली. ती का हसते? हे त्या तरुणांना कळले नाही. त्यांनी तिच्याजवळ तिच्या हसण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली,"मी यामुळे हसले कारण या धरतीवर तुमच्यासारखे सजलेले, सुंदर आणि बलशाली तरुण आहेत. ती धरतीमाता किती भाग्यशाली आहे. माझे हसू हे देवाप्रती आभाराचे आहेत." हे ऐकून ते तरुण तिथेच उभे राहिले. राबियांचे कबुतराला दाणे टाकण्याचे कामही चालूच होते. त्या त्यांच्या कामात मग्न होत्या. मग काही वेळाने त्या रडू लागल्या. तरुणांना कळेना कि काही वेळापूर्वी हसणारी हि स्त्री अचानक का बरे रडू लागली. ते त्यांच्याजवळ गेले व पुन्हा त्यांना रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी राबिया त्यांना म्हणाल्या," आधी मी हसले होते धरतीवर किती बलशाली तरुण आहेत पण हे तरुण त्यांच्या इच्छाशक्तीचा, बलाचा वापर सेवेसाठी करत नाहीत. तरुणांनी या बलाचा वापर जर सृजनासाठी केला तर जगाचे किती कल्याण होईल. असे होत नाही आणि त्यांची बुद्धी त्यांना हे करण्याची का प्रेरणा देत नाही या गोष्टीने मला रडू आले." तरुणांना आपली चूक लक्षात आली. राबियाने त्यांना प्रेरित केले.त्यांच्याकडून सेवा करून जरी घेता आली नाही तरी तहानलेल्याना पाणी, भुकेलेल्याना अन्न आणि मायेचे दोन शब्द प्रत्येकासाठी द्यायला हवे हे त्यांना समजावले.
तात्पर्य - प्रत्येकाने जर थोडे थोडे सत्कार्य केले तर जग सुंदर दिसण्यास वेळ लागणार नाही. दुसरा कोणी करण्याची वाट पाहण्यात आयुष्य संपून जाते.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon