दैनिक परिपाठ
16 जानेवारी
•संकल्पना - वृषाली सुरेश खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
> 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
दुर्बल मनाचा मनुष्य
कधीच महात्मा होऊ शकत नाही.
🔺️ दिनविशेष
२००८ : टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे अनावरण
१९९८ : ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ’ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर
१९९६ : पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड
१९७९ : शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले. १९७८ : रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द
१९५५ : पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न.
🔶️ वाक्प्रचार व अर्थ
▪️वाक्प्रचार व अर्थ : पोटात कावळे ओरडणे - खूप भूक लागणे.
▪️वाक्य : जेवायला उशीर झाल्यावर राजुच्या पोटात कावळे ओरडायला लागले.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : असतील शिते तर जमतील भूते
▪️अर्थ : फायदा असेल तर त्या माणसाच्या आजूबाजूला फिरणे.
🔺️ कोडे
▪️नेहमीच असतो मी तुमच्या घरी, तरी काहींनाच मी आवडतो. एकावर एक कपडे मी घालतो.तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते. सांगा पाहू मी आहे तरी कोण?
▪️उत्तर -कांदा
✳️ सामान्यज्ञान
१) राजगुरूंचे जन्मगाव कोणते ?
उत्तर - खेड, जिल्हा पुणे
२) अहमदनगर जिल्ह्यातील गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेले गाव कोणते ?
उत्तर - मढी
३) संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय ?
उत्तर -डेबुजी झिंगराजी जानोरकर
४) 'राजगुरू' या प्रसिद्ध क्रांतिकारकाचे पूर्ण नाव काय ?
उत्तर - शिवराम हरी राजगुरू
५) आधुनिक काळातील संदेश वाहनांची साधने कोणती ?
उत्तर - पत्र ,संगणक ,मोबाईल, फोन वर्तमानपत्र ,दूरदर्शन संच, म्युझिक प्लेअर, रेडिओ
🔺️ बोधकथा
महत्त्व
एका आश्रमात एक महात्मा राहत होते. सोबत त्यांचे काही शिष्यपण होते. काही विशिष्ट मुद्द्यावर चर्चा सुरु होती. महात्मा त्या सर्वांचे विचार ऐकत होते आणि आणि आपले विचारही व्यक्त करत होते. या दरम्यान महात्म्याच्या नजरेस काही तरी पडले व ते त्या दिशेने जावू लागले. त्यांनी ती पडलेली वस्तू उचलून घेण्यास एका शिष्याला सांगितले. दुपारी जेंव्हा महात्मा आपल्या कुटीत परत आले तेंव्हा त्यांनी त्या शिष्याला बोलावले व सकाळी उचलून घेतलेल्या कापसाबद्दल त्याला विचारले असता तो शिष्य म्हणाला,"तुम्ही सांगितलेला कापूस मी उचलला खरा पण काही काळाने मी कचरा समजून तो फेकून दिला. आता तो कचराकुंडीत असेल. " महात्मा म्हणाले,"अरे ! मी या कापसाऐवजी तुला धन किंवा सोने दिले असते तर असेच कचराकुंडीत टाकले असते का? तो कापूस बाहेर उघड्यावर पडला याचा अर्थ कापूस जिथे ठेवला आहे तेथुन कापूस बाहेर वाऱ्याने किंवा अन्य कोणत्या कारणाने बाहेर कसा पडला? शेतकऱ्याने इतक्या कष्टाने तयार केलेल्या कोणत्याही गोष्टी अशा जर थोड्या थोड्याने जर वाया जावू लागल्या तर आपल्या बरोबर समाजाचेहि नुकसान यातून होणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फेकून द्यायला लागलो तर त्यातून आपलाच तोटा आहे. कापसाचा तुकडा असेना का पण ज्याने तो कातून ठेवायच्या ऐवजी बाहेर टाकला त्याने कापसाचा तुकडा नाही तर भविष्यात निर्माण होणारे धन फेकून दिले आहे. लक्षात ठेव ! कष्टाने धन मिळते, पण मिळालेल्या धनाचा योग्य वापर करणे, गुंतवणे हेही तितकेच महत्वाचे आहे."
तात्पर्य- धन हे जरी उपभोगासाठी असले तरी ते चुकीच्या मार्गाने व्यर्थ रीतीने खर्चले जावू नये. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा महत्वपूर्ण असतात.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon