सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 09 January

  

दैनिक परिपाठ 
09 जानेवारी 

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना


🔺️ सुविचार 

आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.

🔺️ दिनविशेष 

२००१ : नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.

१९१५ : महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन

१८८० : क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा

📋 बातम्या 

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 

▪️वाक्प्रचार व अर्थ : कुरवाळणे - गोंजारणे. 

▪️वाक्य : आई आपल्या मुलाला कुरवाळते.

🔺️ म्हणी व अर्थ 

▪️म्हण : असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी 

▪️अर्थ  : स्वतः आळशी पणाने काहीही उद्योग नं करता दैवावर विसंबून सर्व सुखे मिळण्याची अपेक्षा धरणे.

🔺️ कोडे 

▪️तुम्ही एका माकडा सोबत त्याच्या घरात गेलात 

तिथे त्याचा संपूर्ण परिवार केळी खात होता 

तर त्या घरातील सगळ्यात हुशार कोण? 

▪️उत्तर- तुम्ही

🔺️ सामान्यज्ञान 

१) सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता?

उत्तर - दिल्ली

२) इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजारावर होतो ?

उत्तर - मधुमेह

३) रवींद्रनाथ टागोर यांना कोलकत्ता विद्यापीठाने कोणती पदवी दिली?

उत्तर - डी. लीट

४) माळीन गाव दुर्घटना केव्हा घडली?

उत्तर - 30 जुलै 2014

५) भूदान चळवळ सुरू करणारे कोण ?

उत्तर - आचार्य विनोबा भावे

🔺️ बोधकथा 

 कासव आणि ससा

​एका जंगलात एक ससा आणि कासव राहत होते. ससा स्वतःच्या वेगावर खूप गर्विष्ठ होता आणि तो नेहमी कासवाच्या संथ गतीची थट्टा करायचा.

​एक दिवस कंटाळून कासवाने सश्याला शर्यत लावण्याचे आव्हान दिले. सश्याने हसत हसत ते स्वीकारले. शर्यत सुरू झाली! ससा वाऱ्याच्या वेगाने धावला आणि बराच पुढे निघून गेला. मागे वळून पाहिले तर कासव कुठेच दिसत नव्हते.

​सश्याने विचार केला, "कासव तर अजून खूप मागे आहे, तोपर्यंत मी या झाडाखाली थोडी विश्रांती घेतो." थंड हवेमुळे सश्याला गाढ झोप लागली.

​दुसरीकडे, कासव न थांबता, न थकता संथ गतीने चालत राहिले. त्याने सश्याला झोपलेले पाहिले, पण तो थांबला नाही. शेवटी, कासव ध्येयापर्यंत पोहोचले आणि शर्यत जिंकले. जेव्हा सश्याला जाग आली, तेव्हा त्याला समजले की तो शर्यत हरला आहे.

या कथेचा बोध:

"हळूहळू पण सातत्याने केलेले प्रयत्न नेहमी यशाकडे नेतात." (Slow and steady wins the race.)

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)


Previous
Next Post »