दैनिक परिपाठ
08 जानेवारी
•संकल्पना - वृषाली सुरेश खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
> 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका.
🔺️ दिनविशेष
२००१ : भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
२००० : लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
१९६३ : लिओनार्डो डा व्हिन्सिच्या ’मोनालिसा’चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.
📋 बातम्या
▪️वाक्प्रचार व अर्थ : कोसळणे - जोरात पडणे.
▪️वाक्य : भरपूर पावसामुळे झाडे कोसळली.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : एकाने गाय मारली म्हणून दुसरयाने वासरू मारू नये .
▪️अर्थ : समोरच्या माणसाने आपल्याशी बेजबाबदार वर्तन केल्यास आपणही त्याचेच अनुकरण करू नये.
🔺️ कोडे
▪️अशी कोणती गोष्ट आहे,जी आपण खाण्यासाठी विकत घेतो पण कधीच खात नाही?
उत्तर : ताट/चमचा
🔺️ सामान्यज्ञान
|
| १) न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ? - सर जेम्स चँडविक. २) युरोपचे क्रीडांगणाचा देश कोणता आहे ? - स्वित्झर्लंड. ३) खोजीहार हे सरोवर कोणत्या राज्यात आहे ? - हिमाचल प्रदेश. ४) भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी पासून सुरू झाली ? - २६ जानेवारी १९५०. ५) केनिया या देशाची राजधानी कोणती आहे ? - नैरोबी. | |||||
कथेचे नाव : गर्व आणि नम्रता
एका मोठ्या नदीच्या काठी लव्हाळा (गवत) आणि एक अवाढव्य वडाचे झाड होते. वडाच्या झाडाला स्वतःच्या मजबुतीचा आणि उंचीचा खूप अभिमान होता. तो नेहमी लव्हाळ्याला हिणवायचा, "तू किती कमकुवत आहेस! जरासा वारा आला की तू वाकतोस. माझ्याकडे बघ, मी वादळातही ताठ उभा राहतो."लव्हाळा फक्त हसून शांत राहायचा.
एके दिवशी अचानक खूप मोठे वादळ आले. जोराचा वारा सुटला आणि मुसळधार पाऊस पडू लागला. लव्हाळ्याने नेहमीप्रमाणे आपली नम्रता दाखवली आणि तो जमिनीपर्यंत वाकला. त्यामुळे वाऱ्याचा जोर त्याच्यावरून निघून गेला आणि त्याला काहीच इजा झाली नाही.
दुसरीकडे, वडाचे झाड आपल्या गर्वात ताठ उभे राहिले. त्याने वाऱ्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, शेवटी वडाचे झाड मुळासकट उपटून खाली पडले.
वादळ शमल्यावर लव्हाळा पुन्हा ताठ उभा राहिला, पण दिमाखात उभे असलेले वडाचे झाड मात्र जमिनीवर कोसळले होते.
बोध (Moral of the Story):
अति गर्व विनाशाला कारणीभूत ठरतो. कठीण प्रसंगात जो नम्र राहतो, तोच टिकून राहतो.
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon