सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 07 January

 

दैनिक परिपाठ 
07 जानेवारी 

•संकल्पना - वृषाली  सुरेश खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना


🔺️ सुविचार 

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते.

🔺️ दिनविशेष 

१९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.

१९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.

१९३५ : कोलकाता येथे ’इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी’चे (INSA) उद्‌घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले

📋 बातम्या 

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 

▪️वाक्प्रचार व अर्थ : कंप पावणे - थरथरणे. 

▪️वाक्य : भूकंप आल्यावर जमीन कंप पावली.

🔺️ म्हणी व अर्थ 

▪️म्हण : संगोसंगी वडाला वांगी 

▪️अर्थ  : एखादी विशिष्ट गोष्ट एकाने दुसऱ्याला ,दुसऱ्याने तिसऱ्याला सांगताना शेवटी मूळगोष्ट बाजूला राहून तिसरेच काहीतरी निर्माण होणे.

🔺️ कोडे 

▪️कोकणातून आली एक नार 

आहे तिचा पदर हिरवागार 

आहे तिचा कंबरेला पोर 

सांगा मी आहे तरी कोण? 

▪️उत्तर- काजू

🔺️ सामान्यज्ञान 

१) भारताचा कमाल पूर्व पश्चिम विशाल किती किलोमीटर आहे ?

उत्तर - 2933 किलोमीटर

२) बॉक्साईटच्या उपयोग मुख्यत्वे कोणता धातू मिळवण्यासाठी होतो ?

उत्तर -ॲल्युमिनियम 

३) भूदान चळवळ सुरू करणारे कोण ?

उत्तर - आचार्य विनोबा भावे

४) रात्री फिरणारा व दिवसा झाडावर उलटा लटकणारा जो प्राणीही नाही व पक्षीही नाही असा कोण?

 उत्तर - वटवाघुळ

५) भारतात सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

 उत्तर - हरियाणा

🔺️ बोधकथा 

सोन्याची थाळी आणि दोन वेळची भाकरी

एका मोठ्या शहरात सोमनाथ नावाचा एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहायचा. त्याच्याकडे बंगला, गाडी आणि नोकरचाकर यांची कमी नव्हती. तरीही तो नेहमी अस्वस्थ असायचा. त्याला वाटायचे की अजून मोठे घर हवे, अजून जास्त पैसे हवेत. त्याच्या 'इच्छा' कधीच संपत नव्हत्या.

एके दिवशी तो जंगलातून प्रवास करताना रस्ता चुकला. चालून चालून तो खूप दमला आणि त्याला खूप भूक लागली. संध्याकाळ झाली होती, पण आजूबाजूला खाण्यासारखे काहीच नव्हते. त्याच्याकडे खिशात खूप पैसे होते, पण तिथे विकत घ्यायला काहीच नव्हते.

​चालता चालता त्याला एका छोट्या झोपडीत दिवा दिसला. तिथे एक गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. सोमनाथने तिथे जाऊन खाण्याचं काहीतरी मागितलं. शेतकऱ्याने त्याला आनंदाने आत बोलावले आणि आपल्या वाट्याची दोन भाकरी आणि कांदा सोमनाथला दिला.

​दिवसभर उपाशी असलेल्या सोमनाथला ती साधी भाकरी जगातील सगळ्यात चविष्ट पदार्थ वाटली. त्याचे पोट भरले आणि त्याला खूप शांत वाटले.

​तेव्हा शेतकऱ्याने विचारले, "मालक, आपल्याकडे तर खूप श्रीमंती दिसते, मग तुम्ही एवढे व्याकुळ का होता?"

​सोमनाथ हसून म्हणाला, "आज मला समजले की, पोट भरण्यासाठी फक्त दोन भाकरींची 'गरज' असते, जी तू पूर्ण केलीस. पण आतापर्यंत मी सोन्याच्या थाळीची 'इच्छा' धरून बसलो होतो, ज्यामुळे मी कधीच समाधानी नव्हतो. माझी गरज स्वस्त होती, पण माझ्या इच्छा खूप महाग होत्या."

या गोष्टीचे तात्पर्य (Moral):

'गरज' पूर्ण झाली की माणसाला शांती आणि समाधान मिळते, पण 'इच्छा' ही समुद्राच्या पाण्यासारखी असते; ती जितकी प्यावी, तितकी तहान वाढतच जाते.

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)


Previous
Next Post »