दैनिक परिपाठ
06 जानेवारी
•संकल्पना - वृषाली सुरेश खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन कचरूलाल सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली अनिल कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
आधी विचार करा; मग कृती करा.
🔺️ दिनविशेष
● १९२९ : गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन
● १९२४ : राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता
● १९१२ : न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.
▪️वाक्प्रचार व अर्थ : तल्लीन होणे- गुंग होणे.
▪️वाक्य : दादा खेळून आल्यावर अभ्यास करण्यात तल्लीन झाला.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : आलीमिळी गुपचिळी
▪️अर्थ : आपले गुपित किंवा रहस्य उघडकीसयेऊ नये म्हणून गप्प बसणे.
🔺️ कोडे
▪️दिवसा झोप काढुनी मी
फिरतो बाहेर रात्रीला मी
आहे असा प्रवासी मी
पाठीला दिवा बांधून मी
कोण आहे मी ?
▪️उत्तर -काजवा
🔺️ सामान्यज्ञान
१) चले जाव ही घोषणा कोणाला उद्देशून होते ?
उत्तर - इंग्रजांना
२) सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी काढले ?
उत्तर - गोपाळ गणेश आगरकर
३) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील मोठे राज्य कोणते ?
उत्तर - राजस्थान
४) 'स्वातंत्र्यवीर' असे कोणाला संबोधतात ?
उत्तर - विनायक दामोदर सावरकर
५) भारतीय भूखंडाच्या तीन दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमूळता होत जाणाऱ्या भागास काय म्हणतात?
उत्तर - भारतीय द्वीपकल्प
🔺️ बोधकथा
मुंगी आणि पारवा
एका नदीच्या काठी एक मोठे झाड होते. त्या झाडावर एक पारवा (कबुतर) राहत होता. एके दिवशी त्याने पाहिले की, एक मुंगी चुकून नदीच्या पाण्यात पडली आहे आणि ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे.
पारव्याला तिची दया आली. त्याने पटकन झाडाचे एक पान तोडले आणि मुंगीच्या जवळ पाण्यात टाकले. मुंगी त्या पानावर चढली आणि सुखरूप काठावर आली. तिने पारव्याचे मनापासून आभार मानले.
काही दिवसांनंतर, तिथे एक शिकारी आला. त्याने झाडावर बसलेल्या पारव्यावर नेम धरला. मुंगीने हे पाहिले. आपल्या मित्राचा जीव धोक्यात आहे हे ओळखून ती वेगाने गेली आणि तिने शिकाऱ्याच्या पायाचा जोरात चावा घेतला!
शिकाऱ्याचा नेम चुकला आणि गोळीचा आवाज ऐकून पारवा उडून गेला. अशा प्रकारे, मुंगीने पारव्याचे प्राण वाचवले.
तात्पर्य (Moral of the Story)
"दुसऱ्याला केलेली मदत कधीही वाया जात नाही. आपण कोणाचे चांगले केले, तर आपल्यासोबतही चांगलेच होते."
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
THANKS FOR VISIT




ConversionConversion EmoticonEmoticon